आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्रूंना वाट मोकळी करून द्या, ते तुम्हाला बळ देतील;  ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिना’निमित्त सचिन तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर लिहिली होती चाहत्यांसाठी पोस्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारत रत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या १.८ कोटी चाहत्यांसाठी एक भावनिक पत्र लिहिले आहे. आंतरराष्ट्रीय पुरूष दिनानिमित्त बुधवारी त्याने इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले,पुरुषांनी आपल्या भावना लपवून ठेवू नयेत. काही प्रसंगी भावना अनावर झाल्या तर त्या लपवू नका. अश्रूंना वाट मोकळी करून द्या. हे वाहणारे अश्रूच तुम्हाला बळ देतील. सचिनने आंंतरराष्ट्रीय करिअरमधून १६ नोव्हेंबर २०१३ रोजी संन्यास घेतला होता. स्वत:च्या भावना सांगताना तो म्हणाला, पुरुषांनी रडावे, हे योग्य आहेे. आपली भावना व्यक्त केल्यानंतरही त्याचे पौरुषत्व कमी होत नाही. यासाठीच हा संदेश आहे. सादर आहे सचिन तेंडुलकरचे पुरुषांना लिहिलेले पत्र...
तुम्ही लकवरच पती, पिता, भाऊ, मित्र, मेंटॉर अथवा शिक्षक व्हाल. तुम्हाला उदहारणे द्यावी लागतील. तुम्हाला कणखर व धाडसी व्हावे लागेल. परंतु तुमच्या आयुष्यात काही असे क्षण येतील, जेव्हा तुम्हाला भिती, संशय, व अडचणींचा अनुभव येईल. तुम्ही अपयशी ठराल आणि तुम्हाला रडावेसे वाटेल, हा क्षणही तुमच्या आयुष्यात येईल. परंतु तुम्ही तुमचे अश्रू लपवण्याचा कसोशीने प्रयत्न कराल. आपण खंबीर असल्याचे दाखवाल. कारण पुरुष असेच करतात. पुरुषांना अशा प्रकारेच मोठे केले जाते व पुरुषांना असेच वागावे लागत्याते, अशी समजूत आहे. या समजुतीतूनच मीही मोठा झालो आहे. परंतु हे खोटे आहे.  दु:ख व संघर्षातूनच मी कणखर व यशस्वी ठरलो. १६ नोव्हेंबर २०१३ ही तारीख मी आयुष्यात कधी विसरणार नाही. त्या दिवशी पॅव्हेलियनमध्ये परतत असताना खूप अवघड झाले होते. माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु होते. मला खूप भरून आले होते. परंतु अचानक माझ्या डोळ्यातून जगासमोर अश्रू वाहू लागले. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे, माझ्या मनाला खूप शांत वाटले. रडण्यात व आसवे गाळण्यात लाज कसली? तो तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे. यातूनच तुम्ही खंबीर बनता. तुमचे दु:ख इतरांना सांगण्यासाठी खूप हिंमत लागते.पण त्यातून तुम्ही सर्वात खंबीर व चांगले व्यक्ती होऊ शकता, हे मात्र अगदी सत्य आहे.  पुरुषांनी काय करावे? काय करू नये या रुढीतून बाहेर पडा. तुम्ही कितीही मोठ्या व्यक्ती असाल,  कोठेही असा, पण तुम्ही हिंमत दाखवावी, असेच मला वाटते. -  सचिन तेंडुलकरबातम्या आणखी आहेत...