सचिन तेंडुलकरचे गुरू / सचिन तेंडुलकरचे गुरू आणि क्रिकेटचे भीष्माचार्य रमाकांत आचरेकर कालवश; यांच्या तालमीत घडले दिग्गज क्रिकेटपटू

Jan 02,2019 07:31:00 PM IST

मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे गुरु, क्रिकेटचे भीष्माचार्य आणि पद्मश्री रमाकांत आचरेकर (वय-87) यांचे बुधवारी (ता.2) सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होते.

आचरेकर सरांनी सचिन तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रवीण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी क्रिकेटपटूंना घडवले आहे. यापैकी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि प्रवीण आमरे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधीत्त्व केले आहे. आचरेकर सरांच्या निधनाने क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे.

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीने आपले क्रिकेट करियर सोबतच सुरु केले होते. स्कूल क्रिकेटमध्ये सचिन आणि विनोदने 664 धावांची धमाकेदार भागिदारी केली होती.

X