आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटर शाहिद आफ्रिदी होणार पाकिस्तानचा भावी पंतप्रधान ? ट्विटरवर होत आहे चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी आणि लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांच्या गळा भेटीचा एक फोटो व्हायरल होत आहे. यावर युजर्स अनेक मत मांडत आहेत. खूप जण म्हणाले की, "आफ्रिदी पाकिस्तानचा नवा पंतप्रधान होईल." तर एकाने लिहीले, "आफ्रिदी पुढील पंतप्रधान झाल्यावर, हा पीओकेही
भारताला देऊ टाकेल."

एका युजरने आफ्रिदी आणि गफूर या दोघांचा एक फोटो शेअर करत लिहीले, "पुढील पंतप्रधान बनण्याकडे वाटचाल?" तर दुसऱ्या एका युजरने ट्वीट केले, "हा पागलांचा देश आहे." एका युजरने लिहीले, "आफ्रिदीतर इम्रान खानपेक्षा मोठा खोटारडा आहे. पाकिस्तानी नागरिकांना रडावं लागणार आहेत."

13 सप्टेंबरला पीओकेच्या मुजफ्फराबादमध्ये इम्रान खान यांनी रॅली काढली होती. काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर तिळपापड झालेल्या इम्रान खान यांचा हा दुसरा पीओके दौरा होता. यावेळी शाहिद आफ्रिदीदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होता. त्यानेही काश्मीरच्या नावाने नागरिकांना भडकवणारे भाषण केले.

आफ्रिदी म्हणाला- मुस्लिमांवर अन्याय होतो
आपल्या भाषणात आफ्रिदी म्हणाला, " मी काश्मीरसोबत आहे, मी अन्यायाच्या विरोधात आहे, शोषितांच्या सोबत आहे. मुद्दा काश्मीरचा नाहीये, मुद्दा माणुसकीचा आहे. जगाच्या पाठिवर कुठेही अन्याय झाल्यावर, आम्ही पाकिस्तानी/मुस्लिम त्याविरुद्ध आवाज उठवणार. पण अन्याय फक्त मुस्लिमांवरच का होत आहेत?"