आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cricketer Shoaib Akhtar Speaks Over Danish Kaneria Pakistani Hindu Former Spinner Treated Differently

शोएब अख्तर म्हणाला : दानिश कनेरियाबद्दल सत्य सांगितले, माझ्या वक्त्यावरून मागे हटणार नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोकांनी हे ध्यानात असू द्या आता 1920 नाही तर 2020 आहे, काळ बदलला आहे - रावळपिंडी एक्सप्रेस
  • शोएब काही दिवसांपूर्वी म्हणाला होता की, दानिश हिंदू असल्यामुळे त्याच्यासोबत भेदभाव होत होता

स्पोर्ट डेस्क - पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरने काही दिवसांपूर्वी दानिश कनेरिया हिंदू असल्यामुळे त्याच्यावर अन्याय झाला. काही खेळाडू त्याच्यासोबत जेवण देखील करत नव्हते, असे विधान केले होते. यानंतर शोएबने दानिश कनेरियावरील आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. तसेच यावेळी त्याने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. एका नवीन व्हिडिओत शोएब म्हणाला की, माझ्या त्या वक्त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानने कधीही वंशभेदाला चालना दिली नाही. प्रत्येक संघात एक वा दोन खेळाडू अशा गोष्टींमध्ये व्यस्त असतात. त्यावेळी देखील असेच झाले होते. परंतु मी जे काही सांगितले ते सत्य होते. 

पाकिस्तान कट्टरतावादाचा शिकार


शोएबच्या विधानावर केवळ पाकिस्तानातच नव्हे तर भारतातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आता शोएबने यावर मौन सोडले आहे. एका नवीन व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्टीकरण देत आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. शोएब म्हणाला की, "मी दानिशबाबत एक विधान केले होते. यावर अनेक चर्चा होत आहेत. लोक कशाप्रकारे हा मुद्दा उठवत होते हे मी देखील पाहत होतो. मी म्हणालो होतो की काही खेळाडू दानिशला पसंत करत नाही. परंतु संपूर्ण संघासोबत असे घडत नव्हते. प्रत्येक संघात एक वा दोन खेळाडू अशा गोष्टींमध्ये व्यस्त असतात. मी अशा लोकांशी काटेकोरपणे वागलो. याबाबत दुसऱ्या एका खेळाडूने माझे समर्थन केले होते. पाकिस्तान कट्टरतावादाचा शिकार राहिला आहे." 

शोएबने दिले स्पष्टीकरण


शोएबने आपल्या बचावात बराच युक्तीवाद केला. तो म्हणाल की, "ही गोष्ट 15 वर्षे जुनी आहे आणि आता काळ बदलला आहे. आता 1920 नाही तर 2020 आहे. आम्ही सर्व धर्मांचा सन्मान करतो. यामुळे माझ्या विधानाला धार्मिक रंग देऊ नये. तसेच यावर राजकारण करण्याची आवश्यकता नाही. आमचे पंतप्रधान इम्रान खान यांनी करतापूर कॉरिडोर खुले केले. येथे कटासराज आणि महादेवाचे मंदिर आहे. मुस्लिमच वर्णद्वेषाचे अधिक बळी ठरतात. दरम्यान मी जे काही बोललो ते सत्य होते. जर कोणी असा विचार करीत असेल की मी माघार घेईन, तर असे होणार नाही. मी मागे हटणारा माणून नाही."

बातम्या आणखी आहेत...