आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळसा खाणीत मजूर होते या प्रसिद्ध क्रिकेटरचे वडील, स्टेडिअममध्ये बसलेल्या फॅनवर झाला होता फिदा, तिच्यासोबतच थाटला संसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - वेस्टर्न कोलफील्ड्समध्ये काम करणारे कोळसा खाण कर्मचारी तिलक यादव यांच्या घरी 25 ऑक्टोबर 1987 रोजी उमेशचा जन्म झाला. मूळचे उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील तिलक यांना आधीच दोन मुली आणि एक मुलगा होता. कोळसा खाणीत नोकरी मिळाल्याने नागपूरजवळील खापरखेड्यात राहू लागले. आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने कोणत्याही एकाच मुलाने शिकावे, असे तिलक यांना वाटायचे. मात्र, त्यांनी खाण्यापिण्यात कुचराई केली नाही. त्यांच्याकडे गाय होती. त्यामुळे घरी दूधदुभते होते. नाष्ट्यात पोळी, भाजी आणि वरणासोबत भरपूर तूप असायचे. 


पोलिस व्हायचे होते उमेश यादवला...
- उमेशला पोलिसांत नोकरी मिळावी, अशी तिलक यांची इच्छा होती. वडिलांच्या आज्ञेवरून उमेशनेही लष्कर, पोलिसांत भरती होण्यासाठी भरपूर तयारी केली. 
- पण, नशिबाची साथ मिळत नव्हती. टेनिस बॉलने क्रिकेट खेळण्याचा छंद असलेल्या उमेशने एकदा वडिलांना सांगून टाकले होते की, तुम्ही माझ्या खेळाने एक तर लोकप्रिय व्हाल नाही तर बरबादच...
- उमेश 2008 पर्यंत टेनिस बॉलनेच क्रिकेट खेळला. विदर्भ संघटनेचा कर्णधार प्रीतम गंधेची एकदा उमेशवर नजर पडली. 
-2008 मध्येच उमेशला पहिल्यांदा रणजी खेळण्याची संधी मिळाली. पहिल्याच डावात त्याने 75 धावा देऊन 4 बळी मिळवले. 
- याच कामगिरीच्या आधारे त्याला दुलीप करंडक खेळण्याची संधी मिळाली आणि 2010 मध्ये आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याच्यावर बोली लावली. त्यानंतर त्याच्यावर जणू पैशाचा पाऊसच पडला.
- उमेश यादवची सध्याची वार्षिक कमाई किमान 10 कोटींच्या घरात आहे. खाणकामगाराचा मुलगा आज करोडोत खेळतोय.


फॅशन डिझायनरसोबत लग्न
क्रिकेटवेडी फॅशन डिझायनर तान्या वाधवा नेहमीच उमेशचा खेळ पाहायची. एका मित्राच्या माध्यमातून ई-मेलद्वारे दोघांचा संपर्क झाला. एके दिवशी उमेशने तान्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. दोघांच्या राहणीमानात खूप फरक होता. उमेश अत्यंत ग्रामीण भागातला तर तान्या दिल्लीत वाढलेली. पण तान्याला त्याचा साधेपणा भावला आणि तीन वर्षांतच दोघांनी लग्न केले. गतवर्षी भारतीय रिझर्व बँकेच्या नागपूर येथील कार्यालयात तान्याची अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...