आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
जींद (हरियाणा) - इंग्लंडमध्ये होणाऱ्या आतंरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषकासाठी सोमवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. दरम्यान संघात होणाऱ्या निवडीबाबत क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची आई सुनीता देवी सोमवारी सकाळपासून अस्वस्थ होती. आपले मुलाला संघात स्थान मिळाण्याबाबत त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दुपारी 3 वाजेनंतर संघाची घोषणा झाल्याची बातमी टीव्हीवर आल्यानंतर चहलच्या आईचा आनंद गगनात मावला नाही. काही वेळानंतर युजवेंद्रचा फोन आल्यानंतर आईच्या आनंद आणखीनच वाढला. यानंतर ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या दोघी बहिणींनी आईला फोन करून युजवेंद्रच्या निवडीची वार्ता सांगितली.
आता फक्त विश्वचषक जिंकून आणा मग नंतर......
युजवेंद्रच्या निवडीवर बोलताना युजवेंद्रच्या आईने म्हणणे आहे की, आता फक्त एकच स्वप्न आहे. मुलाने चांगला खेळ करावा आणि संघाने विश्वचषक घरी आणावा. यानंतर लगेच त्याचा विवाह करून देणार आहे. बीसीसीआयने सोमवारी वर्ल्डकपची 15 सदस्यीय टीमची घोषणा केली. यामध्ये युजवेंद्र चहल निवड झालेला हरियाणाचा एकमेव खेळाडू आहे.
मुलाचे प्रदर्शन पाहून मुलाची वर्ल्डकपसाठी निवड होण्याबाबत खात्री होती.
सुनीता देवींनी सांगितले की, मुलाची निवड होणार याची त्यांना खात्री होती. युजवेंद्रच्या प्रदर्शनामुळे तो नक्कीच वर्ल्डकप याची त्यांना खात्री होती. पण जोपर्यंत संघाची घोषणा झाली नाही तोपर्यंत त्यांचे मन अस्वस्थ झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.