Home | Sports | Cricket | Cricket Celebrities | Cricketers who fell in love with married women to become second husbands

हे आहेत विवाहित महिलांना प्रपोज करून दुसरे पती होणारे क्रिकेटर्स; यादीत शिखरसह कुंबळेंचाही समावेश

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 12:01 AM IST

आयशा आणि शिखर यांची मैत्री फेसबूकवर झाली होती.

 • Cricketers who fell in love with married women to become second husbands

  स्पोर्ट्स डेस्क - काही क्रिकेटर्स आपल्या खेळापेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत राहतात. भारतीय क्रिकेटसह जगभरात असे अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांना विवाहित महिलांवर प्रेम जडले. हसत-हसत ते या महिलांचे सेकंड हस्बंड देखील बनले आहेत. मॅरिड महिलांवर फिदा होऊन त्यांच्यासोबत संसार थाटणाऱ्या क्रिकेटर्समध्ये शिखर धवनसह अनिल कुंबळे यांचाही समावेश आहे. आम्ही आपल्याला अशाच काही क्रिकेटर्स आणि त्यांच्या लव्ह लाइफबद्दल माहिती देत आहोत.


  2 मुलांच्या आईवर फिदा झाला होता शिखर
  - शिखर धवनची पत्नी आयशा मुखर्जीचा पहिला विवाह ऑस्ट्रेलियाच्या एका उद्योजकाशी झाला होता. 10 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात तिला दोन मुली सुद्धा आहेत.
  - आयशा आणि धवन यांची पहिली भेट फेसबूकवर हरभजन सिंगने करून दिली होती. धवनने आयशाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर दोघांची मैत्री दिवसेंदिवस वाढत गेली आणि प्रेमात बदलली.
  - धवनने आयशासोबत विवाहाचा निर्णय घेतला, तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी तीव्र विरोध केला. तरीही 2012 मध्ये या दोघांनी विवाह केला. धवनशी लग्न झाल्यानंतर आयशाने एका मुलाला जन्म दिले असून त्याचे नाव जोरावर ठेवण्यात आले आहे. आयशा सध्या मेलबर्नमध्ये राहत आहे.
  - धवनचे आयशाच्या दोन्ही मुलींसोबत घट्ट नाते आहे. धवन नेहमीच आपल्या फॅमिलीचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असतो.
  - क्रिकेटमधून त्याला वेळ मिळेल तेव्हा तो मेलबर्नला पोहोचतो. आयशा सुद्धा आपल्या मुला-मुलींसोबत वेळोवेळी भारतात येते.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर इंडियन आणि फॉरेन क्रिकेटर्सबद्दल आणखी काही माहिती...

 • Cricketers who fell in love with married women to become second husbands

  अनिल कुंबळे आणि चेतना
  - स्टार क्रिकेटर बनण्यापूर्वी कुंबळेने आपले मन चेतना या ट्रॅव्हल एजंटला दिले होते. चेतना आधीपासूनच विवाहित होती. मात्र, ती आपल्या पतीसोबत खूष नव्हती. काही दिवसांतच चेतना आणि कुंबळे एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 
  - 1998 मध्ये चेतनाने आपला पहिला विवाह संपवण्याचा निर्णय घेतला. कुंबळेने चेतनाला घटस्फोट घेण्यात आणि मुलीचा ताबा घेण्यात पुरेपूर मदत केली. 1 जुलै 1999 रोजी कुंबळे आणि चेतनाने विवाह केला. असे करताना आधीच विवाहित असलेल्या कुंबळेने आपली पहिली पत्नी आरुणीला सोडलेले नाही. अनिल आणि चेतना यांना दोन आपत्ये आहेत.

 • Cricketers who fell in love with married women to become second husbands

  मुरली विजय आणि निकिता
  - टेस्ट करिअरचा स्टार बॅट्समन मुरली विजयच्या पत्नीचे नाव निकीता असे आहे. निकीता यापूर्वी क्रिकेटर दिनेश कार्तिकची पत्नी होती. दिनेश आणि निकीताचा विवाह 2007 मध्ये झाला होता. कार्तिक आणि निकीताचे कुटुंबीय एकमेकांना ओळखत होते. 
  - 2012 मध्ये आयपीएल-5 च्या वेळी निकीता मुरली विजयच्या संपर्कात आली. निकीता आणि मुरली विजयमध्ये जवळिकता निर्माण झाली. 
  - दिनेशला याचा पत्ता लागताच त्याने वेळीच निकीताला घटस्फोट दिला. निकीताने सुद्धा लागलीच मुरली विजयशी विवाह केला. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 

 • Cricketers who fell in love with married women to become second husbands

  उपुल थरंगा आणि निलांका
  - श्रीलंकन क्रिकेटर उपुल थरंगा आपलाच सहकारी क्रिकेटर तिलकरत्ने दिलशानच्या पत्नीच्या प्रेमात पडला होता. थरंगामुळेच दिलशान आणि त्याच्या पत्नीमध्ये वितुष्ट आले होते असे वृत्त माध्यमांवर पसरले होते. दिलशानला घटस्फोट देऊन निलांकाने उपुल थरंगाशी विवाह केला. 
  - तर, 2008 मध्ये दिलशानने श्रीलंकेची टीव्ही कलाकार मंजुलाशी लग्न केले. आता या दोघांना तीन आपत्ये आहेत.

 • Cricketers who fell in love with married women to become second husbands

  इमरान खान आणि रेहाम खान
  - पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे विद्यमान  पंतप्रधान इम्रान खान यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव रेहाम खान असे होते. हा रेहम आणि इम्रान दोघांचाही दुसरा विवाह होता. यापू्र्वी रेहामचा विवाह मानसोपचार तज्ञ एजाज रेहमान याच्या झाला होता. हा विवाह 1993 ते 2005 पर्यंत टिकला होता.
  - इम्रान-रेहामने डिसेंबर 2014 मध्ये गुपचूप लग्न केले होते. 41 वर्षांची रेहम पाकिस्तानात एक ब्रिटिश पत्रकार म्हणून कार्यरत होती. रेहामचा जन्म लीबियात झाला तर पालक पाकिस्तानी आहेत. वर्षभरातच दोघांनी एकमेकांना घटस्फोट दिला. 

  - त्यांनी नुकताच तिसरा विवाह एका महिला धर्मगुरूशी केला. ती देखील आधीच विवाहित होती.

Trending