आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जप्त वाळूचे ट्रॅक्टर लांबवणाऱ्या तिघांवर गुन्हा, दाेघांना पकडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जळगाव : अवैध वाळू वाहतूक करताना अाढळलेले ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडून जिल्हाधिकारी कार्यालयात लावले हाेते. वाळूतस्करांनी ते शनिवारी रात्री १०.३० वाजता लांबवले. तलाठ्यांच्या पथकाने पंचमुखी हनुमान मंदिराजवळून या ट्रॅक्टरसह दाेघा चाेरट्यांच्या मुसक्या आवळल्या. तर तिसऱ्या संशयिताचा शाेध सुरू आहेे. 


मोहसीन खान अय्युब खान (वय २०, रा. शाहूनगर), शेख शाहीद शेख शब्बीर (वय २९, रा. ख्वाजानगर, पिंप्राळा), चालक महेंद्र सपकाळे (वय २७, रा. सावखेडा) अशा तिघांवर गुन्हा दाखल केला. महेंद्र वगळता दाेघांना ताब्यात घेण्यात अाले. शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास तहसीलदार अमोल निकम यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून ट्रॅक्टर पळवून नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी जळगाव शहर तलाठी रमेश वंजारी यांना फोन करून जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले. वंजारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर तेथे तहसीलदार निकम, नशिराबाद मंडळ अधिकारी अमोल पाटील व खेडीचे तलाठी लक्ष्मीकांत बाविस्कर हे उपस्थित होते. या सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून पळवून नेलेल्या ट्रॅक्टरचा शोध घेतला. त्या वेळी पंचमुखी हनुमान मंदिराजवळ मागच्या बाजूस एक ट्रॅक्टर लावलेले दिसले. पथक जवळ जात असताना ट्रॅक्टरवरील चालक व त्याच्यासोबत असलेला एक जण पथकाला पाहून पळून गेला. महसूल पथकाने ट्रॅक्टर तपासले असता निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर आढळून आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून पळवून नेलेले तेच ट्रॅक्टर असल्याची पथकाची खात्री पटली. त्या वेळी ट्रॅक्टरजवळ दोन व्यक्ती ट्रॅक्टरचे काम करत होते. त्यांनी त्यांचे नाव मोहसीन खान अय्युब खान (वय २०, रा. शाहूनगर) व शेख शाहिद शेख शब्बीर उर्फ पप्पू मिस्तरी असे सांगितले. ट्रॅक्टर चालकाचे नाव महेंद्र असे सांगितले. पोलिसांच्या मदतीने ट्रॅक्टरसह आरोपींना जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दाेन दुचाकीही जप्त करण्यात अाल्या अाहेत. तलाठी रमेश वंजारी यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

तहसीलदारांना तस्करांचा पुळका; चाेरीचे कलम न लावण्याचे केले हाेते सूचित 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून वाळूतस्करांनी ट्रॅक्टर पळवल्याच्या गुन्ह्यात जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या अंमलदारांनी भादंवि कलम ३७९, ५११ व ३४ या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले; परंतु तहसीलदार निकम यांना ट्रॅक्टर पळवणाऱ्यांचा पुळका आला. भादंवि कलम ३७९ लावू नका, असे तहसीलदारांनी ठाणे अंमलदारांना सांगितले. त्यानंतर त्यांनी या गुन्ह्यात भादंवि कलम १५१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली; परंतु हा प्रकार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी कलम ३७९ का लावले नाही? अशी ठाणे अंमलदारांना विचारणा केली. तहसीलदार निकम यांनी हे कलम लावू नका, असे सांगितल्याची ठाणे अंमलदारांनी माहिती दिली. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून भादंवि कलम ३७९ सह गुन्हा नोंद झाला. 


२७ जानेवारी :
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून ७ ट्रॅक्टर लांबवण्यात अाले हाेते. त्यात तीन नंबर असलेले तर चार विनाबंरचे हाेते. तस्करांची दहशत यातून ठळकपणे समाेर अाली. 


२ फेब्रुवारी :

महसूल पथकाने जप्त केलेले वाळूचे डंपर तस्करांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातून लांबवले हाेते. सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी हा धक्कादायक प्रकार घडला हाेता, हे विशेष. 

बातम्या आणखी आहेत...