आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२४ वर्षीय परिचरारिकेला आत्महत्येस प्रवृत्त केले, अंबाजोगाईच्या बालरोगतज्ज्ञावर गुन्हा नोंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई- शहरातील सायगाव नाका परिसरात असलेल्या एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या २४ वर्षीय परिचारिकेने रक्तदाबाच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची घटना मे महिन्यात घडली होती. घटनेच्या तीन महिन्यांनंतर बालरोगतज्ज्ञावर शहर पोलिस ठाण्यात आत्महत्येस कारणीभूत ठरल्याची तक्रार मृत परिचारिकेच्या आईने दिल्यानंतर शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. 


विवेकानंदनगर भागात राहणारी नम्रता साळबा भताने ही परिचारिका सायगाव नाका भागात असलेल्या डॉ. विजय लाड यांच्या खासगी रुग्णालयात काम करत होती. दोन वर्षे या रुग्णालयात काम केल्यानंतर नम्रता हिने १ मे २०१८ रोजी रक्तदाबाच्या गोळ्या खाल्या. तिची प्रकृती गंभीर झाल्यानंतर २ मे रोजी ती मरण पावली. या प्रकरणी नम्रताच्या आईने शहर पोलिस ठाण्यात तक्रारीत डॉ.विजय लाड आणि नम्रताचे प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे व डॉ.लाड यांनी लग्नाचे आमिष दाखवल्याचे म्हटले आहे. परंतु लग्न करण्यास संबंधित डॉक्टरांनी नकार दिल्याने नम्रताने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने शहर पोलिसांत दिली आहे. 


ही घटना घडून तीन महिने झाल्यानंतर मृत परिचारिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार डॉ. विजय लाड यांच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांत शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड करत आहेत. 


आरोप चुकीचा; चौकशीला तयार 
परिचारिका मृत्यू प्रकरण विनाकारण माझ्या माथी मारून रुग्णालयाची बदनामी करत पैशाची मागणी निष्फळ ठरल्याने हा केलेला आरोप आहे. या घटनेत आपण दोषी नसून पोलिसांच्या सर्व चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. 
- डॉ. विजय लाड, बालरोगतज्ञ, अंबाजोगाई. 

 

बातम्या आणखी आहेत...