आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Crime In Nagpur Of Chief Minister; NCP Chief Sharad Pawar Criticizes The Chief Minister

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच गुन्हेगारी; राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुख्यमंत्री यांच्यावर टीका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड  - भाजप सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत पाहिजे तशी विकास कामे केलेच नाहीत मग त्यांना मत मागण्याचा काय अधिकार आहे. पाच वर्षांत प्रत्येक गोष्टीला ज्यांनी अपयश आणले. त्यांच्यात हातात सरकार द्यायचे नाही, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री राहतात त्या नागपूर शहरात सगळ्यात जास्त गुन्हेगारी आहे. नागपूरची आज ‘क्राईम सिटी’ म्हणून ओळख असल्याची टीका  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री यांच्यावर केली. शहरातील रामकृष्ण लॉन्सवर बुधवारी दुपारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

व्यासपीठावर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माजी मंत्री शिवाजीराव पंडित, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, डॉक्टर आघाडीचे डॉ. नरेंद्र काळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश सोळंके, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, युवक आघाडीचे मेहबूब शेख आदी  उपस्थित होते. पवार म्हणाले, महाराष्ट्रात आज वेगळे चित्र असून नवी पिढी, शेतकरी वर्ग अस्वस्थ आहेत. ज्यांना सत्ता दिली त्यांनी शेतकरी हिताचे कार्यक्रम राबवले नाही. कष्टाने पिकवलं, पदरात पडलं, पण घामाची किंमत मिळाली नाही. बँकेचे कर्ज फेडता आले नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहेत.  १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. भाजप सरकारने कर्जमाफी ऑनलाइन केली, प्रत्यक्षात लाभ किती लोकांना मिळाला याबाबत चौकशी केली तेव्हा ४० टक्केच लोकांना लाभ मिळाला. ६० टक्के शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज तसेच आहे.  बेरोजगारांची संख्या वाढली. रोजगारासाठी केंद्र, राज्य सरकारने पाउले टाकले नाहीत. तरुणात नैराश्य आहे. आमच्याकडे सत्ता होती. तेव्हा आम्ही कारखाने आणून रोजगार निर्माण केल्याचेही पवार म्हणाले.
 

क्षीरसागरांना राज्यमंत्री कोणी केले?
काही लोकांना उपरती आली. पक्ष सोडून का जाताहेत? असं विचारलं तर विकासासाठी तिकडे जातो असे म्हणतात. मला आठवतं क्षीरसागरांना राज्यमंत्री कोणी केले. तिसऱ्या वेळी आमदारकीचेही तिकिटही दिले. यंदाच्या निवडणुकीत बीडमधून संदीप क्षीरसागर निवडून येतीलच, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. 

बातम्या आणखी आहेत...