आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जालना- एका बुकीने ब्रोकिंग अॅण्ड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाखाली अनधिकृत ऑनलाइन लाॅटरी सेंटर सुरू करून त्याच्या माध्यमातून शहरात आठ ठिकाणी सुरू केलेल्या सेेंटरवर धाडी टाकून नऊ जणांना अटक करत त्यांच्या ताब्यातून ४ लाख ५८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शहरात एसडीएस ब्रोकिंग अॅण्ड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाखाली जालना शहरात ८ ठिकाणी जुगार लॉटरी सेंटर सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. शहरातील या आठ सेंटर चालवण्यामागचा प्रमुख बुकी दिनेश कुंडलिकराव बनकर (राजमहल टॉकीजजवळ) याच्या सांगण्यावरून घेत असल्याचे आठ आरोपींनी सांगितले. शहरातील गांधी चमन भागातील अनिल सुखदेव जाधव (४२, गांधी चमन) याचे सोमेश्वर ब्रोकिंग अॅण्ड ट्रेडिंग सेंटर नावाच्या लॉटरी मस्तगड येथील दुकानातून ५० हजार ९०० रुपयांच्या मुद्देमालासह जुगाराचे साहित्य जप्त केले. यानंतर कडबीमंडी भागातील मनोज बालचंद परिवाले (३५, अग्रसेन नगर) याच्या दुकानातून ३८ हजार ५१० रुपयांचा, इम्रानखान सरवर खान याच्या रेल्वे स्टेशन परिसरातील दुकानातून ५१ हजार ५००, संतोष कचरुलाल परिवाले याच्या दुकानातून ७९ हजार ६० रुपयांचा, अंबड चौफुलीजवळील भास्कर दामोदर पाईकराव याच्या दुकानातून ५६ हजार १२० रुपयांचा, पाणीवेस भागातील गजानन कारभारी कावळे (बुटेगाव) याच्या दुकानातून ४४ हजार ४४० रुपयांचा, देविदास दिनानाथ चव्हाण याच्या आझाद मैदान परिसरातील दुकानातून ६९ हजार ६० रुपयांचा, औरंगाबाद चौफुलीवरील शेख इब्राहिम शेख मोईनोद्दीन याच्या दुकानातून ६८ हजार ५१० रुपयांच्या मुद्देमालासह जुगाराचे साहित्य, संगणक, मॉनिटर, सीपीयू, प्रिंटर, कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, आकडे लिहिलेले कागदी बोर्ड, रक्कम, मोबाइल असा ४ लाख ५८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.