आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत नववीतील विद्यार्थ्याची दादागिरी; मुलांकडून मागितले पैसे, त्यांनी दिला नकार तेव्हा चाकूने केले वार...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- सुदामा नगर परिसरात एका खासगी शाळेत एका अल्पवयीन मुलाने दोन विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. नववीतील 13 वर्षीय विद्यार्थ्याने सातवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांवर चाकुने वार केले. यात दोन्ही विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना एमवायएच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी हजर होऊन आरोपी विद्यार्थ्याला अटक केली. दिपक असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शाळेत असताना आरोपी विद्यार्थ्याने त्याच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावर दिपकने नकार दिल्यानंतर आरोपी विद्यार्थ्याने आपल्या बॅगेतून चाकू काढून दिपकवर चाकू हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.    


पोलिसांनी सांगितल्यानुसार, दहावीचा विद्यार्थी दिपकला वाचवण्यासाठी गेला असता आरोपी विद्यार्थ्याने त्याच्यावरही चाकू हल्ला चढवला. त्यानंतर जखमी विद्यार्थ्यांच्या मित्रांनी तातडीने दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक केली. आरोपी विद्यार्थी अल्पवयीन असल्या कारणाने पोलिसांनी त्याच्यावर ज्युवेनाइल जस्टिस अॅक्टअंतर्गत कारवाई करण्याची माहिती दिली आहे.  

 

 

बातम्या आणखी आहेत...