आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोपडा येथे गॅस एजन्सीत चाेरी; 75 हजार रुपये राेख लंपास; सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआरही गायब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा- येथील माजी आमदार जगदीश वळवी यांचे चोपडा ते यावल जुन्या रस्त्यालगत असलेले जगदीश गॅस एजन्सीचे कार्यालय चोरट्यांनी शनिवारी (ता. २९ राेजी) रात्री १२ वाजेपासून ते पहाटे ७ वाजेदरम्यान फोडले. कार्यालयातील ७५ हजार रुपये आणि गॅसबाबत दस्ताऐवज लंपास केले आहेत. तसेच सीसीटीव्ही चित्रण करणारा डीव्हीआर संचासह चोरट्यांनी हातसफाई केली. 

चोपडा शहर पोलिसांनी जळगाव येथून चोरट्यांचा माग लावण्यासाठी श्वानपथक बोलाविले. मात्र, श्वान जगदीश गॅस एजन्सीच्या अवतीभवतीच फिरले. त्यानंतर पोलिसांनी धुळीचे कारण सांगून अधिक तपास लागू शकत नाही असे सांगितले. श्वानने पुढे दिशा न दाखवल्यामुळे तपास करणे अवघड झाले आहे. 

 

या घटनेतील चोरटे हे सराईत आहेत. त्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर बॉक्स देखील चोरून नेला. आरोपीच्या तपासासाठी घटनास्थळी शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार आणि त्यांची कुमक घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. त्यात कार्यालयातील सर्व कपाटाचे ड्रॉवर व सीसीटीव्हीचा डीव्हीआर बॉक्स फोडून कागदपत्र व रोख ७५ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. जगदीश गॅस एजन्सीचे व्यवस्थापक रितेश पंढरीनाथ महाजन यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार तापस करत आहेत. 

 

चोऱ्यांचे प्रमाण वाढले 
चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांची जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी तडकाफडकी बदली केली. त्यानंतर चोपडा शहर पोलिस ठाण्यात निरीक्षक पदावर कोणीही नसले तरी प्रभारी अधिकारी म्हणून एपीआय मनोज पवार काम पाहत अाहेत. चोपडा शहर पोलिसांना मोठी गस्त वाढवावी लागणार असून शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालेे. 

बातम्या आणखी आहेत...