आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सापडलेले सोने स्वस्तात देतो म्हणत थोपवले एक किलो पितळाचे मणी; कापड विक्रेत्याला हजारोंचा गंडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सापडलेले एक किलो सोने स्वस्तात देतो, असे आमिष दाखवून दोघांनी एका कापड विक्रेत्याला ४० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. विक्की संजय त्रिभुवन (२५, रा. गंगापूर) यास सोने विकत घेण्यासाठी दोघांनी २० डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता कॅनॉट परिसरात बोलावले होते. त्यामुळे हा गुन्हा सिडको पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

 

काही दिवसांपूर्वी त्रिभुवन याच्या दुकानावर दोघे कपडे खरेदीसाठी गेले होते. कपडे पाहून झाल्यानंतर विविध विषयांवर गप्पा मारत त्रिभुवनचा विश्वास जिंकला. गप्पा मारताना त्यांनी त्रिभुवन व त्याच्या आईला आम्हाला नुकतेच एक किलो सोने सापडले आहे. परंतु ते मोडता येत नाही. त्यामुळे ते स्वस्तात विकायचे आहे, असे सांगितले. त्रिभुवनने सोने विकत घेण्यात रस दाखवला. काही दिवसांनी दोघांनी त्यास विविध ठिकाणी बोलावून भेट रद्द केली. २० डिसेंबर रोजी पुन्हा फोन करून कॅनॉट परिसरात बोलावले. त्रिभुवन हा आईसोबत आल्यानंतर दोघांनी त्याच्याकडून ४० हजार रुपये व एक मोबाइल घेऊन एक किलो सोनेसदृश मणी दिले. घरी गेल्यानंतर ते सोने नसून पितळेचे मणी असल्याचे लक्षात आले.

 

गुन्हा दाखल करण्यास गंगापूर पोलिसांचा नकार 
सोने विक्रीचे बोलणे गंगापूर येथे झाले होते. त्यानंतर त्यांनी कॅनॉटमध्ये बनावट सोने दिले. फसवणूक झाल्याने लक्षात येताच त्रिभुवन गंगापूर पोलिस ठाण्यात गेला. परंतु पैशाची देवाणघेवाण औरंगाबादला झाली, तुम्ही तिकडे जा, असे म्हणून गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...