आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीत चढताना महिलेच्या पर्समधून अलगद चोरला सोन्याच्या दागिन्यांचा डबा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- चाळीसगाव येथे लग्नासाठी निघालेल्या महिलेच्या पर्समधून बसमध्ये चढताना साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना मध्यवर्ती बसस्थानकावर घडली.

 

बसमध्ये चढताना चोरट्याने पर्समध्ये ठेवलेला दागिन्यांचा डबा सफाईने लांबवला. बुधवारी दुपारी ही घटना घडली. बीबी गणपत पवार ( ५२,रा.टी.व्ही.सेंटर ) असे महिलेचे नाव आहे.

चाळीसगाव येथील नातेवाइकाकडे लग्न होते. त्यात हजर राहण्यासाठी पवार दाम्पत्य २६ डिसेंबर रोजी दुपारी मध्यवर्ती बसस्थानकावर गेले. लग्नाला जात असल्याने त्यांनी घरातील त्यांचे सर्व जवळपास ३ लाख ५० हजार रुपयांचे जुने सोन्याचे दागिने एका डब्यात ठेऊन तो डबा पर्स मध्ये ठेवला होता. दुपारी सव्वा एक वाजेच्या मध्यवर्ती बसस्थानकावर गेल्यानंतर ते सव्वा एक वाजता ते धुळे बस मध्ये बसले. परंतु बस मध्ये चढत असताना त्यांच्या पर्सची चैन उघडून चोराने पवार यांच्या नकळत त्यांच्या पर्स मध्ये वरच्या बाजूस ठेवलेला डबा चोराने अलगद लांबवला. बसमध्ये बसल्यानंतर त्यांना पर्सची चैन उघडी दिसल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ बसमधून उतरले व क्रांती चौक पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक एस. शिंदे पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...