आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनेस जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सासूला कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद| सुनेला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात तिची सासू आरोपी कलाबाई एकनाथ साठे (५५, रा. मिसारवाडी) हिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.ए.ए. खतीब यांनी दिले. प्रकरणात पीडितेच्या पतीला पोलिसांनी पूर्वीच अटक केली असून त्याला १५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सविता सुनील साठे (२६) या विवाहितेने तक्रार दिली. ४ ऑक्टोबर रोजी आरोपी सुनील याने दारूच्या नशेत शिवीगाळ करत उंदीर मारण्याचे औषध सविता पाजले. कलाबाई हिने सविताला घराबाहेर काढले, असे तक्रारीत म्हटले होते. सविताच्या जबाबावरून आरोपींविरोधात सिडको पोलिस ठाण्यात कलम २९४(ब), ३०७, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणात सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी काम पाहिले. 

बातम्या आणखी आहेत...