आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑपरेटरचे हातपाय बांधून रक्कम, कॉपर वायर पळवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज- तालुक्यातील मस्साजोग गावापासून एक किमी अंतरावर उत्तरेश्वर पिंपरी रस्त्यावर विद्युत महावितरणच्या विद्युत उपकेंद्रात शनिवारी रात्री सूरज गवळी या ऑपरेटरची ड्युटी होती.

 

रात्री ११ वाजेच्या सुमारास १० ते १२ दरोडेखोरांनी उपकेंद्रात प्रवेश केला. तोंडाला रुमाल व हातात लोखंडी हत्यारे असलेल्या दरोडेखोरांनी ऑपरेटर सूरजला मारहाण करत त्यांच्या खिशातील दोन्ही मोबाइल व ५ हजार घेऊन  तोंडात रुमाल कोंबून दोरीने हातपाय बांधून रूममध्ये कोंडले. नादुरुस्त अवस्थेत पडलेल्या ३.५ एमव्हीचा पॉवर ट्रान्सफॉर्मर लोखंडी हत्याराने तोडून त्याच्यातील कॉपर वायर काढून चोरट्यांनी तेथून पलायन केले. तोपर्यंत ऑपरेटर गवळी यांनी दोरीने बांधलेले हात ताणून ओढून सोडले. कोंडलेल्या रूमचा दरवाजा उघडून गावाकडे पळ काढला. दरम्यान, नागरिक व पोलिसांनी परिसरात फिरून चोरट्यांचा शोध घेतला. मात्र चोरट्यांचा शोध लागला नाही. 

बातम्या आणखी आहेत...