आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला न पाठवल्याने जावयाने चावा घेत तोडले सासूचे बोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पत्नीला सोबत न पाठवण्याचा राग आल्याने जावयाने सासूच्या बोटाला चावा घेत बोट तोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेली माहिती आणि रंगाबाई सोनवणे (रा. अशोकस्तंभ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी (दि. २१) संशयित बाळकृष्ण थोरात हा पत्नी व मुलीला घेण्यासाठी अाला होता. त्याला घरातील मोठ्या व्यक्तींना घेऊन ये, तरच मुलीला सासरी पाठवेन असे सांगितले. याचा राग आल्याने संशयिताने मुलीस मारहाण केली. हात पकडून त्यास विरोध केला. सोडवण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने डाव्या हाताच्या मधल्या बोटाला जोरात चावा घेत पुढील भाग तोडून टाकला. संशयिताच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...