आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकराेडला बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी केली अडीच लाखांची घरफाेडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत साडेसात तोळ्याचे सोन्याचे अडीच लाखांचे दागिने चोरून नेले असून याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

सुभाषरोड येथील प्रसिद्ध व्यापारी विजय चोरडिया (रा. चोरडिया निवास, गायकवाड मळा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, ते २३ डिसेंबर रोजी गुजरात येथे एका कार्यक्रमासाठी सहकुटुंब गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराची कडीकाेयंडा ताेडून आत प्रवेश करीत साडेसात तोळ्याचे सोन्याचे दागिने म्हणजेच सुमारे अडीच लाखांचा ऐवज घेऊन पाेबारा केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...