Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Crime news in nashik

चोरट्यांचा धुमाकूळ: कारच्या काचा फोडून लॅपटाॅप, एटीएम कार्डची चाेरी

प्रतिनिधी | Update - Jan 03, 2019, 11:25 AM IST

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी (दि.१) चाेरट्यांनी कारचालकांना चांगलाच दणका दिला आहे.

 • Crime news in nashik

  नाशिक- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी (दि.१) चाेरट्यांनी कारचालकांना चांगलाच दणका दिला आहे. उच्चभ्रू वसाहत असलेल्या गंगापूररोड, बिगबझार, खतीब डेअरी व तिबेटियन मार्केट परिसरात पार्क केलेल्या पाच वेगवेगळ्या कारच्या काचा फोडून चोरट्यांनी लॅपटॉप व इतर कागदपत्रे चोरून नेली आहेत. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  मंगळवारी (दि. १) रात्री आठच्या सुमारास चोरट्यांनी चोपडा लॉन्स येथे पार्क केलेल्या एमएच १५ डीएस ८२२० या क्रमांकाच्या अल्टो कारमधून आरसी बूक, पॅनकार्ड व मतदान कार्ड चोरून नेले. एमएच १५ जीएल ६००० या क्रमांकाच्या गाडीतून बँक पासबूक, डेबीट कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड चाेरले. खतीब डेअरीसमोरील एमएच १५ ईपी ७३१९ या क्रमांकाच्या होंडा सिटी कारमधून २० हजारांचा लॅपटॉप, तिबेटीयन मार्केट येथे पार्क केलेल्या एमएच १५ डीएस ६५०३ या क्रमांकाच्या वॅगनआर कारमधून डेल कंपनीचा लॅपटॉप आणि बिग बझार येथे पार्क केलेल्या एमएच ४६ एयू ३०७१ या क्रमांकाच्या मारुती ब्रेझा कारमधून पॅनकार्ड, डेबिटकार्ड व आरसी बूक चोरून नेले. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  दुचाकीच्या धडकेत एक ठार
  सातपूर-अंबड लिंक रोडवरील दत्तमंदिर स्टॉपसमोर भरधाव दुचाकीने पाठीमागून अॅक्टिव्हाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात अॅक्टिव्हाचा चालक लक्ष्मण मनाेहर शिंदे (३५) ठार झाला. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि. ३१ डिसेंबर) दुपारी २ वाजता लक्ष्मण शिंदे हे आपल्या एमएच १५ एफएच ०४८३ या क्रमांकाच्या अॅक्टिव्हावरून जात होते. ते दत्तमंदिर स्टॉपसमोरील रस्त्यावरून जात असताना अज्ञात मोटारसायकलीवरील चालकाने एक्स्लो पॉइंटकडून अंबड टी पॉइंटकडे जाताना पाठीमागून शिंदे यांच्या अॅक्टिव्हाला धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शांताराम शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पुढील तपास एएसआय शेळके करीत आहेत.

  सुंदरनगर येथे गांजा जप्त
  उपनगर पोलिसांनी मंगळवारी (दि. १) देवळाली गावातील दोघांकडून अडीच किलो गांजा जप्त केला आहे. बबलू रामधर यादव (२३) व इलियास गुलाब शेख (रा. सुंदरनगर, देवळाली गाव) अशी संशयितांची नावे आहेत. यातील बबलू यादव याला अटक करून त्याच्याकडून पाच हजार १४० रुपयांचा २५५३ ग्रॅम गांजा जप्त केला. हे दोघेही संशयित गांजाजवळ बाळगून त्याची विक्री करताना आढळून आले. मात्र, पोलिस आल्याची माहिती मिळताच संशयित इलियास शेख पळून जाण्यात यशस्वी झाला. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Trending