आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक- उच्चभ्रू वसाहतीत फ्लॅट भाडेकरारावर घेत अनैतिक व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पश्चिम बंगालमधील तीन तरुणींची पोलिसांनी सुटका केली. बुधवारी (दि. २) दुपारी पारिजातनगर येथे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती व मध्यवर्ती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक भीमराव गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पारिजातनगर येथील एका उच्चभ्रू इमारतीमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पथकाने बनावट ग्राहक पाठवत खात्री केली. येथे संशयित सचिन बाबाजी न्याहारकर (वाहेगाव, चांदवड हल्ली रा. नांदूरनाका), सचिन दिलीप शेवाळे (पेठरोड) पश्चिम बंगालमधील तीन मुलींकडून अनैतिक व्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले. पथकाने मुलींची सुटका केली. त्यांना वात्सल्य निरीक्षणगृहामध्ये पाठवण्यात आले. संशयितांच्या विरोधात अनैतिक देहव्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक कुमार चौधरी, सहायक निरीक्षक सचिन सावंत, शंकर गोसावी, बी. आर. कर्डिले, ए. व्ही. रेवगडे, दीपक पाटील, केदार, संजय गामणे, संदीप पवार, रेखा गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.