आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोरट्यांनी फोडले अॅक्सिस बँकेचे एटीएम; रक्कम पळवण्यात अपयश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- शहरातील माईंदे चौक परिसरात असलेल्या अॅक्सिस बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न झाला. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली असून चोरट्यांना रोकडचा लॉकर खोलण्यात अपयश आल्याने रक्कम वाचली. मात्र, चोरट्यांनी एटीएम मशीनचे जवळपास अडीच लाखाचे नुकसान केले आहे. 

 

या प्रकरणी अॅक्सिस बँकेचे उपशाखा प्रमुख संदीप देशमुख यांनी या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शहरातील माईंदे चौक परिसरात असलेल्या अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात चोरटे अपयशी ठरल्याने त्यांनी बँकेतील एटीएम मशीन, काचा फोडून एटीएम मशीनचे जवळपास दोन ते अडीच लाखांचे नुकसान केले. ही घटना ६ जानेवारीला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच अॅक्सिस बँकेचे उपशाखा प्रमुख संदीप देशमुख, बँकेतील संगम पोपसेटवार आणि शिवराम कविमंडल यांनी एटीएमकडे धाव घेवून पाहणी केली. त्यावेळी त्यांना एटीएम समोरील काचेचे दार तुटलेले दिसून आले. तसेच एटीएमचे मॉनिटर तुटलेले दिसून आले. त्यामुळे अज्ञात चोरट्यांकडून एटीएममधून रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आले. याबाबची माहिती संदीप देशमुख यांनी अवधुतवाडी पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

 

सीसीटीव्ही फुटेजची तपासात मिळणार मदत 
माईंदे चौक परिसरात असलेल्या अॅक्सिस बँकेचे एटीएममध्ये चोरट्यांनी फोडले. मात्र, लॉकर खोलण्यात अपयश आल्याने त्यामधील रक्कम वाचली. या एटीएममध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे आहे. त्यामुळे चोरटे नक्की या कॅमेऱ्यात कैद झाले असतील, यावरून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्याला सुरुवात केली आहे.