पेट्रोल उशिरा आणल्याच्या / पेट्रोल उशिरा आणल्याच्या किरकोळ कारणावरुन नाशकात तरुणाची भोसकून निर्घृण हत्या

अमोल याच्यासाेबत जात असताना रात्री त्याच्या गाडीतील पेट्राेल संपल्याने झाला होता वाद

Dec 18,2018 11:19:00 AM IST

नाशिक- पेट्रोल संपल्याने एका तरुणाची सातपूर औद्योगिक वसाहतीतील सीएट कंपनीसमोर पाेटात चाकू भाेसकून त्याच्याच तीन मित्रांनी हत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. अमोल बागले असे मृतााचे नाव असून याप्रकरणी पाेलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. किरकोळ कारणातून हा खून झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

याप्रकरणी सचिन बागले याने तक्रार दिली आहे. अमोल याच्यासाेबत जात असताना रात्री त्याच्या गाडीतील पेट्राेल संपले. अमोलने त्याचा मित्र लोकेश थोरात यास फोन करून पेट्रोल आणण्यास सांगितले. तो दोन मित्रांसोबत रात्री साडेदहाच्या सुमारास पेट्रोल घेऊन आला. अमोलने पेट्रोल आणण्यास उशीर केल्याने त्याचा लोकेशशी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संशयिताने अमोलच्या पोटात चाकू खुपसला. यात त्याचा मृत्यू झाला.

X