आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पा सेंटरमध्ये सुरू होते हायप्रोफाईल सेक्स रॅकेट; ग्राहक बनून पोहचले पोलिस तेव्हा विदेशी तरुणींसह आढळले सहा तरुण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- चूना भट्टी आणि शिवाजी नगर परिसरात पोलिसांनी हायप्रोफाइल स्पा सेंटरवर धाड टाकून मोठे सेक्स रॅकेट उघडकीस आणले. या कारवाईतून पोलिसांनी पाच विदेशी तरुणींसह 13 कॉलगर्लला पकडले आहे. या धाडीत पोलिसांनी स्पा सेंटरचा मॅनेजर आणि मालकासह 6 ग्राहकांना अश्लील कृत्य करताना पकडले आहे. या ग्राहकांपैकी काही तरुण इंजिनियर तर काहींचा राजकीय पक्षांशी संपर्क आहे. या स्पा सेंटरमध्ये अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून इथे विदेशी तरुणींपेक्षा देशी कॉलगर्लवर मोठी मागणी होती. इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकामागे स्पा सेंटरला 40 टक्के रक्कम मिळत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

विदेशी तरुणींमध्ये थायलंडसह लाओसच्या तरुणींचा समावेश
पोलिसांनी सांगितल्यानुसार, पोलिस गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील जुगार, दारुचा अवैध व्यव्सायासह वेश्या व्यवसायवर नजर ठेवून होते. त्याअंतर्गत पोलिसांना शहरातील स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी काही दिवस नजर ठेवून स्पा सेंटरवर नकली ग्राहक पाठवला होता. त्याच्याकडून इशारा मिळताच एसपी संजय साहू आणि  पोलिसांनी धाड टाकली. धाडीत पोलिसांना सहा कॉलगर्ल ग्राहकांसोबत अश्लील अवस्थेत आढळले. त्यापैकी चार तरुणी थायलंडच्या तर एक लाओसमधील होती.  

 

विदेशी तरुणींनापेक्षा देशी महिलांना होती मोठी मागणी
पोलिसांनी सांगितल्यानुसार, या स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायात दिल्लीच्या कॉलगर्लला मोठी मागणी असून या तरुणी प्रत्येक ग्राहकाकडून 8 ते 10 रुपये वसूल करायच्या. तर विदेशी तरुणींना प्रति ग्राहकामागे 5 ते 7 हजार रुपये मिळायचे. या रकमेतून स्पा सेंटरला 40 टक्के रक्कम मिळत असून उर्वरीत 60 टक्के रक्कम सबंधित तरुणी घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

पोलिस याप्रकरणी कसून तपास करत असून शहरात अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी शहरातील सर्व ठिकाणी बारिक लक्ष ठेवले असून अवैधरित्या वेश्या व्यवसाय चालवणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

बातम्या आणखी आहेत...