आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारच्या 'त्या' गावात घराघरात चालतो फसवणुकीचा धंदा; गाव करते दरमहा लाखोंची कमाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- रामदेवबाबा यांच्या जाहिरातींमुळे घराघरात पोहचलेल्या पतंजली कंपनीची डिलरशीप घेतली तर त्यातून चांगला नफा मिळेल... अन् तोट्यातील शेतीला चांगला जोडधंदा मिळेल, असा निर्णय जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी घेतला. त्यासाठी पतंजली कंपनीच्या वेबसाईटवर माहिती घेण्यास सुरूवातही केली. पण याच वेबसाईटने या शेतकऱ्यांचा घात केला. जेमतेम २३ वर्ष वय असलेल्या एका ठगाने त्यांना या वेबसाईटच्या माध्यमातून तब्बल तीन लाख रुपयांचा गंडा घातला. सप्टेंबर २०१७ मध्ये घडलेल्या या ऑनलाईन फसवणूकीच्या गुन्ह्याचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.... 

 

पतंजलीच्या उत्पादनांची डिलरशीप घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर दोघा शेतकऱ्यांनी वेबसाईटवरील टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधला. हॅलो... अमितकुमार बोल रहा हूँ... हमारी कंपनी में आपका स्वागत है... अशा गोड आवाजात समोरील व्यक्तीने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. सर्व माहिती दिल्यानंतर या व्यक्तीने सर्व कागदपत्र एका मेल आयडीवर मागवून घेतले. नोंदणी शुल्क भरण्यासाठी एका बँकेचा खाते क्रमांक देखील त्याने दोघांना दिला. नोंदणी शुल्कासह इतर कारणे सांगत संबंधित बँक खात्यावर वेळोवेळी पैसे भरण्यास सांगण्यात आले. आपल्याला पतंजलीची डिलरशीप मिळणार असल्याने हे शेतकरी पैसे भरत गेले. नाेंदणी शुल्कासह इतर कारणांसाठी लागणारे सर्व पैसे भरल्यानंतर आपल्या डिलरशीपचा मार्ग मोकळा झाल्याचा आनंद दोघा शेतकऱ्यांना होता. लवकरच पतंजलीचे प्रॉडक्ट आपल्याला मिळतील, त्यानंतर जोमाने कामाला लागायचे... या व्यवसायात मोठी भरारी घ्यायची... असा विश्वास दोघांना होता. तोपर्यंत तब्बल तीन लाख रुपये संबंधित बँक खात्यावर दोघांनी भरले होते. आठ दिवस उलटले, दोन- तीन आठवडे झाले तरी पतंजलीचे प्रॉडक्ट येईनात. संबंधित व्यक्तीला वेळोवेळी फोन करून माल कधी मिळेल, अशी विचारणा केली. सर आपका माल गाडी में लोड होकर निकल चुका है, असे सांगत त्या व्यक्तीने वेळ मारून नेली. आपको और दस लाख रुपये भरणे पडेंगे, असेही तो सांगू लागला. मग मात्र दोन्ही शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले, पण आता तक्रार कुणाची आणि कुणाकडे करायची? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. कशीबशी हिंमत करत त्यांनी पोलिस ठाणे गाठले. संबंधित पोलिसांनी म्हणणे ऐकुण घेत त्यांना सायबर पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. सायबर विभागाचे तत्कालिन निरीक्षक सुनिल पवार यांच्या सर्व प्रकार लक्षात आला. त्याचबरोबर नाव- गाव ठावूक नसलेल्या या आरोपीचा शोध कसा घ्यायचा? असा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा राहीला. संबंधित शेतकऱ्यांना धीर देत पवार यांनी तपासाला सुरूवात केली. पोलिस उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलिस कॉन्स्टेबल राहुल गुंडू, अरुण सांगळे, प्रशांत राठोड, आकाश भैरट यांचे पथक कामाला लागले. तोपर्यंत आरोपी शेतकऱ्यांकडे आणखी दहा लाख रुपये मागतच होता. तुमचा माल निघाला असून चार दिवसांत माल तुम्हाला मिळेल, असेही तो सांगत होता. आरोपी वेगवेगळ्या नंबरवरून फोन करत होता. त्यामुळे नंबर ट्रेस होत नव्हता. त्याचे बँक खाते व मोबाईल क्रमांकासाठीचे कागदपत्रे बनावट असतील, याची खात्री पोलिसांना होती. अखेर संबंधित वेबसाईट, मेल आयडी व इतर तांत्रिक तपास करत आरोपीचे लोकेशन पोलिसांनी शोधले. बिहार राज्यातील पटना येथे असलेल्या या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक तत्काळ रवाना झाले. पण आरोपी कसा दिसतो? पटना येथे तो नेमका कुठे आहे? याची काहीच माहिती पोलिसांकडे नव्हती. पटना येथे सर्वत्र शोध सुरू झाला, पण आरोपीचा कोणताच सुगावा लागला नाही. तांत्रिक तपासानुसार घेतलेले संबंधित ठिकाणाचे एक छायाचित्र पोलिसांना मिळाले. पण त्यात त्यात आरोपी नसून केवळ इमारतीच्या खिडक्यांची ग्रील दिसून आले. अशा प्रकारची ग्रील पटना येथील कोणत्या इमारतींना आहे, याचा शोध सुरू झाला. अखेर अथक प्रयत्नानंतर तशी ग्रील असलेली एक इमारत दिसून आली. पोलिसांनी तत्काळ इमारतीत घुसून आरोपीला ताब्यात घेतले. त्याला नगर येथे आणून अधिक चौकशी केली असता. अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. 

 

पतंजलीच्या उत्पादनांची डिलरशीप घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर दोघा शेतकऱ्यांनी वेबसाईटवरील टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधला. हॅलो... अमितकुमार बोल रहा हूँ... हमारी कंपनी में आपका स्वागत है... अशा गोड आवाजात समोरील व्यक्तीने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. सर्व माहिती दिल्यानंतर या व्यक्तीने सर्व कागदपत्र एका मेल आयडीवर मागवून घेतले. नोंदणी शुल्क भरण्यासाठी एका बँकेचा खाते क्रमांक देखील त्याने दोघांना दिला. नोंदणी शुल्कासह इतर कारणे सांगत संबंधित बँक खात्यावर वेळोवेळी पैसे भरण्यास सांगण्यात आले. आपल्याला पतंजलीची डिलरशीप मिळणार असल्याने हे शेतकरी पैसे भरत गेले. नाेंदणी शुल्कासह इतर कारणांसाठी लागणारे सर्व पैसे भरल्यानंतर आपल्या डिलरशीपचा मार्ग मोकळा झाल्याचा आनंद दोघा शेतकऱ्यांना होता. लवकरच पतंजलीचे प्रॉडक्ट आपल्याला मिळतील, त्यानंतर जोमाने कामाला लागायचे... या व्यवसायात मोठी भरारी घ्यायची... असा विश्वास दोघांना होता. तोपर्यंत तब्बल तीन लाख रुपये संबंधित बँक खात्यावर दोघांनी भरले होते. आठ दिवस उलटले, दोन- तीन आठवडे झाले तरी पतंजलीचे प्रॉडक्ट येईनात. संबंधित व्यक्तीला वेळोवेळी फोन करून माल कधी मिळेल, अशी विचारणा केली. सर आपका माल गाडी में लोड होकर निकल चुका है, असे सांगत त्या व्यक्तीने वेळ मारून नेली. आपको और दस लाख रुपये भरणे पडेंगे, असेही तो सांगू लागला. मग मात्र दोन्ही शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले, पण आता तक्रार कुणाची आणि कुणाकडे करायची? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. कशीबशी हिंमत करत त्यांनी पोलिस ठाणे गाठले. संबंधित पोलिसांनी म्हणणे ऐकुण घेत त्यांना सायबर पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. 

 

सायबर विभागाचे तत्कालिन निरीक्षक सुनिल पवार यांच्या सर्व प्रकार लक्षात आला. त्याचबरोबर नाव- गाव ठावूक नसलेल्या या आरोपीचा शोध कसा घ्यायचा? असा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा राहीला. संबंधित शेतकऱ्यांना धीर देत पवार यांनी तपासाला सुरूवात केली. पोलिस उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलिस कॉन्स्टेबल राहुल गुंडू, अरुण सांगळे, प्रशांत राठोड, आकाश भैरट यांचे पथक कामाला लागले. तोपर्यंत आरोपी शेतकऱ्यांकडे आणखी दहा लाख रुपये मागतच होता. तुमचा माल निघाला असून चार दिवसांत माल तुम्हाला मिळेल, असेही तो सांगत होता. आरोपी वेगवेगळ्या नंबरवरून फोन करत होता. त्यामुळे नंबर ट्रेस होत नव्हता. त्याचे बँक खाते व मोबाईल क्रमांकासाठीचे कागदपत्रे बनावट असतील, याची खात्री पोलिसांना होती. अखेर संबंधित वेबसाईट, मेल आयडी व इतर तांत्रिक तपास करत आरोपीचे लोकेशन पोलिसांनी शोधले. बिहार राज्यातील पटना येथे असलेल्या या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक तत्काळ रवाना झाले. पण आरोपी कसा दिसतो? पटना येथे तो नेमका कुठे आहे? याची काहीच माहिती पोलिसांकडे नव्हती. पटना येथे सर्वत्र शोध सुरू झाला, पण आरोपीचा कोणताच सुगावा लागला नाही. तांत्रिक तपासानुसार घेतलेले संबंधित ठिकाणाचे एक छायाचित्र पोलिसांना मिळाले. पण त्यात त्यात आरोपी नसून केवळ इमारतीच्या खिडक्यांची ग्रील दिसून आले. अशा प्रकारची ग्रील पटना येथील कोणत्या इमारतींना आहे, याचा शोध सुरू झाला. अखेर अथक प्रयत्नानंतर तशी ग्रील असलेली एक इमारत दिसून आली. पोलिसांनी तत्काळ इमारतीत घुसून आरोपीला ताब्यात घेतले. त्याला नगर येथे आणून अधिक चौकशी केली असता. अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
 
गाव करते फसवणुकीच्या माध्यमातून दरमहा लाखोंची कमाई 
फोनवर अमितकुमार नाव सांगणाऱ्या या २३ वर्षीय ठगाचे खरे नाव विकासकुमार होते. तो पटना येथे चार बीएचके प्लॅटमध्ये राहत होता. पटनापासून पाचशे किमी असलेल्या नवादा जिल्ह्यातील लालबिघा हे त्याचे मुळे गाव. त्याच्या गावातील व इतर आसपासच्या गावांतील तरुण अशाच पध्दतीने ऑनलाईन फसवणूक करतात. या गावातील प्रत्येक घरातील एक तरुण ऑनलाइन फ्रॉड करून पैसे कमवतो. महिन्याला एकाला फसवून ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत पैसे कमवले जातात. त्यामुळे घरातील कोणी याला विरोध करत नाही. त्यामुळे तेथील घराघरात असे उद्योग सुरू आहेत. त्यातून देशभरातील लोकांना फसविले जाते. या भागात स्थानिक पोलिस येत नाहीत. दुसऱ्या राज्यातील पोलिस आल्यास त्याच्यावर दगडपेक करून त्याला पळवून लावले जाते, अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात पुढे आली. आरोपी विकासकुमार याचे बीएच्या पहिल्या वर्षापर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले आहे. साथीदारांसह तो ऑनलाइन फसवणुकीच्या धंद्यात उतरला. आतापर्यंत अनेकांना त्याने गंडा घातलेला आहे. विकासकुमार प्रमाणेच त्याच्या गावातील अनेक तरुण बारावीपर्यंतचे शिक्षण घेत ऑनलाइन फसवणुकीचं कसब मिळवत आहेत. यातून संपूर्ण गावात दरमहा लाखो रुपयांची कमाई होत आहे. 

 

... तर घातला असता गंडा 
विकासकुमार हा २३ वर्षीय आरोपी अनेक दिवसांपासून ऑनलाइन फ्रॅाड करत होता. पंजतलीची बनावट वेबसाइट करून महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील नागरिकांना त्याने फसवलेले होते. तांत्रिक तपास करत मोठ्या शिताफीने आरोपी गजाआड करण्यात यश आले. तत्कालिन निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली. आरोपी गजाआड झाला नसता तर त्याने अनेकांना लाखोंचा गंडा घातला असता. प्रतीक कोळी, पोलिस उपनिरीक्षक, सायबर.