आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सैतानालाही लाजवतील या मायलेकींचे गुन्हे! 42 बालकांचा खून करणाऱ्या आई आणि दोन मुलींची कहाणी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - सैतानालाही लाजवेल अशा क्रूर हत्‍याकांडाच्या मुख्य सूत्रधार असलेल्या या तिघी भारतात फाशी सुनावलेल्या पहिल्याच महिला होत्या. या तिघी आपसात आई आणि मुली आहेत. यातील आईचे नाव अंजनीबाई तर मुलींची नावे रेणुका आणि सीमा अशी आहेत. स्वतः आई असलेली ही महिला तिच्या दोन मुलींच्‍या मदतीने इतरांच्या बालकांना पळवून नेत होती. त्‍यानंतर दमदाटी करून त्यांच्याकडून गुन्हेगारी किंवा भीक मागून घेतले जात होते. एखाद्या मुलाने जर या बाबत कुणाला काही सांगितले, तर त्‍याला ठार मारले जात होते.


अशा प्रकारे त्‍यांनी 42 मुलांची कत्तल केली. पोलिसांकडे त्‍याची त्‍यांनी कबुलीही दिली. पण, 42 पैकी 9 हत्‍या झाल्‍याचे न्‍यायालयात सिद्ध झाले. 29 ऑक्‍टोबर 1996 रोजी हे बालहत्याकांड उघडकीस आले. यामुळे अख्खा महाराष्ट्र हादरला होता. सुरुवातीला अंजनाबाई एकटीच मुलांना पळवत असे. नंतर तिने दोन्ही मुलींना त्यात सामील करून घेतले. 1990 च्या सुमारास त्यांनी मुलांना पळवण्यास सुरुवात केली. चोरी, पाकीटमारी करण्यासाठी एक ते तेरा वर्षांपर्यंतच्या बालकांना पळवून त्यांचा खून केल्याचे हे प्रकरण आहे. वर्ष 1997 मध्‍ये अंजनाबाईचा मृत्‍यू झाला. त्‍यामुळे आता रेणुका आणि सीमाच उरल्‍या आहेत.


125 गुन्हेगारी कृत्यांचे आरोप
या कुख्यात मायलेकींच्या टोळीवर जवळपास 125 गुन्हेगारी कृत्यांचे आरोप होते. यामध्ये चोरी, पॉकेट मारणे, चेन स्नॅचिंग, गर्दीच्या ठिकाणी धक्का-बुक्की करून चोरी इत्यादींचा समावेश आहे. परंतु, ही कृत्ये या महिलांच्या गुन्ह्यांचा एक छोटासा भाग होता. 90 च्या दशकात त्यांनी चोरीनंतर मर्डर सुरू केले. त्यावेळी मोठी मुलगी रेणुका 17 वर्षांची तर छोटी मुलगी सीमा फक्त 15 वर्षांची होती. इतक्या कमी वयातच त्या दोघींनी आईसोबत पहिल्या चिमुकल्याची हत्या केली होती.


अशी झाली गुन्हेगारीला सुरुवात
मुख्य आरोपी अंजनीबाईला सोडून तिच्या पतीने दुसरे लग्न केले होते. यानंतर कमाईसाठी तिने गुन्हेगारीची वाट धरली. आपल्यासोबत तिने आपल्या दोन मुलींना देखील यात ओढले होते. मोठी मुलगी रेणुकाला एक मुलगा होता. एक दिवस ती मंदिरात चोरी प्रकरणात पकडली गेली. तेव्हा तिने संपूर्ण आरोप आपल्या मुलावर ढकलले होते. त्यावेळी, लोकांनी दया दाखवून मुलाला सोडून दिले. यानंतर रेणुका अंजनीबाई आणि मायलेकींना लहान मुलांकडून चोरी करून घेण्याची आयडिया आली.


फॅक्ट फाइल...
> 1990 ते 1996 या काळात रेणुका, तिचा पती किरण शिंदे, बहीण सीमा आणि आई अंजनाबाई गावित यांनी 13 लहान मुलांचे अपहरण केले होते. त्यातील नऊ मुलांचा निर्घृण खून करण्यात आला होता.
> आई अंजनाबाईचा 1997 मध्ये मृत्यू झाला. किरण शिंदे हा या खटल्यात माफीचा साक्षीदार झाला होता. दयेचा अर्ज फेटाळल्यामुळे दोन्ही बहिणींच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
> अंजनाबाईचा 17 डिसेंबर 1997 रोजी कारागृहात मृत्यू झाला, त्यामुळे रेणुका व सीमा यांच्यावर खटला चालविण्यात आला. तेरा बालकांचे अपहरण करून खून केल्याचा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला.
> 28 जून 2001 रोजी कोल्हापूरमधील सेशन कोर्टाने या दोघींना नऊ मुलांचा खून केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली. रेणुका व सीमाने याला हायकोर्टात आव्हान दिले.
> हायकोर्टाने 8 सप्टेंबर 2004 रोजी सेशन कोर्टाचा फाशीच्या शिक्षेचा निर्णय कायम ठेवला. या निर्णयाला या बहिणींनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.
> सुप्रीम कोर्टानेही 31 ऑगस्ट 2006 रोजी त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली. फाशीची शिक्षा माफ करावी यासाठी त्यांनी केलेला दयेचा अर्ज दाखल, जुलै 2014 मध्ये राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्याने त्यांच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले.

0