आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दशकांपासून यासीन खान बनून राहत होता सराइत गुन्हेगार अमर वाघ, येथून झाली अटक

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • अटकेपासून वाचवण्यासाठी अमर वाघचा झाला यासीन खान
  • 2 दहशकांपासून मुंबईतच राहत होता, पोलिसांना आता कळाले
  • यासीन खान नावाने बनवले आधार, पॅन कार्ड आणि लायसन्स

मुंबई - मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने सराइत गुन्हेगार आणि दरोडेखोर अमर वाघ (45) याला बुधवारी अटक केली. गेल्या दोन दशकांपासून तो फरार होता. कित्येक वर्षांपासून शोध घेतला असतानाही पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. त्यातच अमर वाघ आता यासीन खान बनून नालासोपरा येथे राहत असल्याची गुप्त माहिती क्राइम ब्रांचला मिळाली. त्याच माहितीच्या आधारे अमर उर्फ यासीनच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

1996 मध्ये कांदिवलीच्या समतानगर परिसरात दरोड्याचे कटकारस्थान करताना पोलिसांनी अमरला अटक केली होती. दरोड्याचा खटला सुरू असतानाच त्याला 1997 मध्ये तात्पुरता जामीन मिळाला होता. याच दरम्यान, तो पोलिसांना चकवा देत फरार झाला आणि त्याचे ठाव-ठिकाण कुणालाच कळाले नाही. पोलिसांनी त्याच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट देखील बजावले. त्यात काही दिवसांपूर्वीच नालासोपारा येथे यासीन मोहंमद खानचा पत्ता पोलिसांना मिळाला. हा यासीन खान प्रत्यक्षात अमर वाघ असल्याचे पोलिसांच्या गुप्त तपासात समोर आले आणि बुधवारी त्याला अटक करण्यात आली.

छोटा राजन गँगशी होता संबंध, यासीन खान नावाने बनवली सरकारी कागदपत्रे

केवळ 1996 चा दरोडाच नव्हे, तर 1995 ते 1998 दरम्यान त्याचे 5 दरोडे, खून आणि इतर प्रकरणांमध्ये नाव आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो छोटा राजनचे गँग मेंबर काशीनाथ पाशी आणि अनिल नादोस्कर उर्फ अंड्यासोबत काम करायचा. फरार असताना तो एका मुस्लिम महिलेच्या प्रेमात पडला आणि इस्लाम धर्म स्वीकारून तिच्याशी निकाह केला. एवढेच नव्हे, तर यासीन खान या नावाने त्याने आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वाहनचालक परवाना सुद्धा बनवला होता. त्याने ही सगळी कागदपत्रे नेमकी कुठून मिळवली, याचा देखील तपास केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...