आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकेत कुलकर्णी खूनप्रकरणी विजय जोगचा जामीन अर्ज मागे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -संकेत कुलकर्णी हत्या प्रकरणात आरोपी विजय जोग याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. पी. आर. बोरा यांच्यासमोर दाखल केलेला नियमित जामीन अर्ज मागे घेतला. 


संकेत कुलकर्णी याचे एका मुलीसोबतचे संबंध आरोपी संकेत प्रल्हाद जायभाये याला खटकत होते. त्यामुळे दोघांमध्ये वाद होत होता. संकेत सिडको एन-३ येथे आला असल्याचे संकेत जायभाये यास समजल्यावर त्याने संकेतला मोबाइलवर संपर्क साधत घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर संकेत कुलकर्णी सिडकोतील कामगार चौकात संकेत जायभायेला भेटण्यासाठी गेला. त्या वेळी दोघांमध्ये वाद झाला. संकेत कुलकर्णी कारमधून उतरून पायी निघाला असता संकेत जायभायेने त्याला कारने जोराची धडक दिली. तसेच त्याच्या अंगावर कार घालून त्याचा २३ मार्च २०१८ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास निर्घृण खून केला. विजय कडुबा वाघ यांच्या तक्रारीवरून संकेत जायभाये, संकेत मचे, विजय नारायण जोग आणि उमर अफसर शेख ऊर्फ पटेल या चौघा जणांविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खून खटल्यात आरोपी विजय जोग याने नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला. या खटल्यात प्रत्यक्ष सहभाग नसल्याने जामिनावर सोडण्याची विनंती त्याने केली. तसेच या प्रकरणात गोवण्यात आल्याचे व तपास अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याने जामीन देण्याची विनंती त्याने केली. तर प्रथमदर्शनी पुरावे आरोपीच्या विरोधात असल्याचा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संजय घायाळ यांनी केला व आरोपीला जामीन देण्यास विरोध केला. 

बातम्या आणखी आहेत...