Home | Maharashtra | Mumbai | Criminalization of 100 people in Mumbai, 50 sellers of 'excessive' fireworks

फटाके उडवणाऱ्या ‘अतिउत्साही’ 100 जणांवर, 50 विक्रेत्यांवर मुंबईमध्ये गुन्हे

विशेष प्रतिनिधी | Update - Nov 11, 2018, 10:40 AM IST

नागपूर शहरातही 63 जणांवर गुन्हे दाखल

 • Criminalization of 100 people in Mumbai, 50 sellers of 'excessive' fireworks

  मुंबई - दिवाळीत फक्त रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शंभराहून अधिक व्यक्तींवर गुन्हे दाखल केले अाहेत. ५३ फटाके विक्रेत्यांवरही नियमभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या फटाक्यांची विक्री केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी सर्वाधिक गुन्हे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान, नागपुरातही अशाच प्रकारे ६३ जणांवर गुन्हे दाखल झाले अाहेत.


  ध्वनी तसेच वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी दिवाळीसह अन्य सणांदरम्यान तसेच विवाहासारख्या समारंभातही रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके फोडावेत असा निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी दिवाळीच्या चार दिवसांदरम्यान धडक कारवाई करत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल शंभर जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी बहुतांश गुन्हे न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळेच्या मर्यादेबाहेरील वेळेत फटाके वाजवल्याने नोंदवण्यात आले आहेत. भादंविच्या कलम १८८, ११०, ११७ आणि कलम ३४ नुसार हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

  न्यायालयाच्या आदेशानंतरही मोठ्या आवाजाचे आणि घातक रसायनांचा वापर असलेल्या फटाक्यांची विक्री केल्याप्रकरणी ५३ फटाके विक्रेत्यांविरोधातही गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिस दलाचे प्रवक्ते, उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिली. मध्य मुंबईत म्हणजेच माटुंगा, शीव, अँटॉप हिल यासारख्या पोलिस ठाण्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे.


  मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी नावालाच
  सर्वोच्च न्यायालयाने मोठा आवाज करणाऱ्या आणि घातक रसायनांचा वापर असलेल्या फटाक्यांच्या उत्पादन आणि विक्रीवरही बंदी घातली आहे. मात्र, मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची न्यायालयाने नेमकी व्याख्या न केल्याने अनेक ठिकाणी सुतळी बॉम्बसारख्या मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची सर्रास विक्री केली जात असल्याचे चित्र होते. तसेच प्रत्येक ठिकाणी जाऊन फटाक्यांच्या आवाजाची पातळी मोजणे पोलिसांना शक्य नव्हते. त्यामुळे बंदी कागदावरच राहिली.

  मुंबईत ठिकठिकाणी आवाहन
  मुंबईतील मरीन ड्राइव्ह, विविध चौपाट्या, मोकळी मैदाने अशा ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यासाठी मुंबईकर माेठ्या संख्येने गोळा होत असतात. ही बाब लक्षात घेत अशा गर्दीच्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी रात्री दहानंतर ध्वनिक्षेपकाच्या साहाय्याने नागरिकांना फटाके न फोडण्याचे आवाहन केले. याचा योग्य तो परिणाम होऊन अनेक ठिकाणी रात्री दहानंतर शांतता असल्याचे दिसून आले.

Trending