आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साथीदाराला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी पोलिस स्टेशनवर 'फिल्मी स्टाईल' हल्ला, AK-47 बंदुकीतून गोळ्या झाडून केला पोबारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलवर(राजस्थान)- अलवरमध्ये हत्यारांसोबत आलेल्या गुंडांनी आज(शुक्रवार) बहरोड पोलिस स्टेशनवर हल्ला चढवला. घटना सकाळी 8:30 ला घडली, तेव्हा ठाण्यात 20 पोलिस कर्मचारी उपस्थित होते. या गुंडांनी अचानक AK-47 बंदुकीने अंदाजे 50 राउंड फायर केले आणि लॉकअपमध्ये बंद असलेल्या आपल्या साथीदाराला सोडवले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पोलिसही काहीच करू शकले नाहीत आणि आपला जीव वाचवण्यसाठी इकडे-तिकडे पळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामधून आलेल्या हल्लेखोरांनी विक्रम उर्फ पप्ला नावाच्या गुंडाला सोडवले. पोलिसांनी गुरुवारी रात्री चेकिंगदरम्यान त्याला पकडले होते. दुसऱ्याच दिवशी गाडीतून काही गुंड आले आणि आपल्याकडील AK-47 आणि इतर हत्यारांने पोलिस स्टेशनवर हल्ला चढवला. स्टेशनवर हल्लेखोरांनी अंदाधून गोळ्या झाडल्या. पोलिसांच्या सुत्रांनी सांगितले की, पप्लाविरुद्ध अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत. याआधीही हरियाणाच्या महेंद्रगडमध्ये न्यायालयात नेत असताना, गुंडांनी त्याला कोर्टाच्या बाहेरून सोडवून नेले होते.

गाडी खराब झाल्यामुळे स्कॉर्पियो चोरली
सूचना मिळताच भिवाडीचे एसपी अमनदीप सिंह पोलिस स्टेशनला पोहचले. त्यानंतर पोलिसांनी जयपूर-दिल्ली हायवे आणि अलवर-नारनौल हायवेवर नाकाबंदी केली. या दरम्यान पळत असताना त्यांची कार खराब झाली, त्यानंतर मंडावरजवळ त्यांनी एक स्कॉर्पियो चोरली आणि त्या ठिकाणीही फायरिंग केली.

बातम्या आणखी आहेत...