आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Crisis In Karnataka: Make Angry People, Save The Government; Congress Leaders Urge In Charge

कर्नाटकात संकट : नाराजांना मंत्री करा, सरकार वाचवा; काँग्रेस नेत्यांनी केले प्रभारींना आर्जव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारवर संकटाचे ढग आले आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस व राज्य प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी पक्षाच्या प्रदेश शाखेच्या नेत्यांशी बैठकांंवर बैठका घेतल्या. 


वेणुगोपाल यांनी बंगळुरू येथील कुमार कृपा गेस्ट हाऊसमध्ये पक्षांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावले होते. त्यात या संकटातून बाहेर पडण्यासाठी एकूण सहा विद्यमान मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यावर सहमती झाली. या बैठकीत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडू राव, काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार इत्यादी उपस्थित होते.  पक्ष सोडण्याची आणि सरकार पाडण्याची धमकी देणाऱ्या आमदारांचा सामना कसा करायचा अशी विचारणा वेणुगोपाल यांनी उपस्थित नेत्यांना केली. त्यावर बंडखोर आमदारांना कॅबिनेट पद किंवा इतर मलाईदार पद देऊन त्यांचे मन वळवले पाहिजे. बैठकीनंतर जी. परमेश्वर म्हणाले, आम्ही बैठकीत लोकसभेत दोन्ही पक्ष व आघाडीचा झालेला पराभव आणि राज्यातील सरकारवर त्याचा परिणाम यावर चर्चा केली. 


तत्पूर्वी वेणुगोपाल यांनी बंडखोर आमदारांची भेट घेतली. बुधवारी सायंकाळी वेणुगोपाल यांनी पक्षाचे आमदार व मंत्री यांची बैठक घेतली होती. त्या बैठकांचा तपशील मिळू शकला नाही. कर्नाटकात सार्वत्रिक निवडणुकीनंतर काँग्रेसच्या दोन आमदारांनी रविवारी बंगळुरूत भाजपत गेलेल्या एस. एम. कृष्णा यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी कॅबिनेटच्या विस्ताराची योजना बनवत आहेत. कॅबिनेटमध्ये तीन रिक्त जागा आहेत. त्या जागा भरण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे, असे सिद्धरमय्या यांनी मंगळवारी सांगितले.