आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंगाच्या कॅन्सरमुळे अवयव काढून मूत्रमार्गच बदलला, जळगावात 60 वर्षीय वृद्धावर दुर्मिळ शस्त्रक्रिया 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या लिंगाच्या कॅन्सरग्रस्त रुग्णावर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन तज्ज्ञ डॉक्टरांनी तब्बल पावणेदोन तास यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णाचे प्राण वाचवले. विशेष म्हणजे ग्रेड-२ मध्ये असलेल्या ६० वर्षीय रुग्णाचे लिंगच काढून टाकले. त्यामुळे मूत्र विसर्गाचा मार्ग बदलण्यात आला.   


जळगाव जिल्ह्यातील ६० वर्षीय वृद्धाला लिंगावर गेल्या जखम झाली हाेती. मात्र, याविषयी इतरांना सांगण्याची त्यांना लाज वाटत होती. त्यामुळे ही बाब अनेक महिने लपवून ठेवली. अस्वच्छता आणि उपचाराअभावी त्यांचे लिंग सडून त्यात अक्षरश: अळ्या पडल्या हाेत्या. व्याधीमुळे त्रस्त झालेला वृद्ध रुग्ण गेल्या आठवड्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आला. या वेळी तपासणी केल्यावर डाॅक्टरांनी त्यांच्या लिंगावर झालेल्या गाठीतून मासाचे दाेन तुकडे हिस्टाेपॅथीलाॅजिकल एक्झामिनेशनसाठी काढून घेतले. हे तुकडे महाविद्यालयाच्या महालॅब व खासगी लॅबमध्ये कॅन्सरच्या तपासणीसाठी पाठवले. या दाेन्ही तपासणीचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला. 


त्या दाेन्ही तपासणीत या रुग्णाला ग्रेड-२च्या कॅन्सरचे निदान झाले. हा कॅन्सर आॅपरेटेबल (शस्त्रक्रियेतून बरा हाेणारा) असल्याने लगेच सर्जरी विभागाचे प्रमुख डाॅ. एम.पी. पाेटे यांनी  महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. भास्कर खैरे व वैद्यकीय अधीक्षक डाॅ. किरण पाटील यांच्याशी चर्चा करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी डाॅ. पाेटे, डाॅ. संगीता गावित व डाॅ. सुशांत सुपे या तिन्ही डाॅक्टरांनी पावणेदाेन तासांत ही शस्त्रक्रिया केली.    

बातम्या आणखी आहेत...