आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेत पुन्हा येण्यासाठी भाजप धार्मिक, जातीय ध्रुवीकरण करणार : चव्हाण यांचा अाराेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- केंद्र व राज्यातील भाजप सरकारने विकासकामांच्या अाणि याेजनांच्या नावे भ्रष्टाचाराची मालिकाच सुरू केली अाहे. या सरकारला हटविण्यासाठी काँग्रेसकडून देशभरातील विराेधी पक्षांची अाघाडी करून २०१९ मध्ये सत्तांतरण करण्याची रणनीती अाखली जात अाहे. मात्र, सत्ताधारी भाजपकडून येत्या काळात धार्मिक, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी माेठ्या प्रमाणात ध्रुवीकरण करून सत्तेत येण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर अाराेप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 


नाशिक शहराच्या दाैऱ्यावर अालेल्या चव्हाण यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत केंद्र व राज्य सरकारच्या विविध याेजना केवळ कागदावर अाणि फसव्या असल्याची टीका केली. माेदी सरकारने राफेल विमान खरेदीत हजाराे काेटींचा भ्रष्टाचार केला असून, त्याचे पुरावे संसदेत सादर करूनही त्यावर उत्तर देण्यात अाले नाही. नाेटाबंदीचा निर्णय असाे की शेती, राेजगार या सर्वच विषयांवर हे सरकार अपयशी ठरले अाहे. त्यांना साधे सल्लागारही टिकविता येत नसल्याचा टाेला लगावला. सर्वच विराेधी पक्षांना एकत्रित अाणून महाअाघाडी स्थापन केली जात अाहे. या अाघाडीमार्फत निवडणूक लढवून या सरकारला सत्तेतून पायउतार करायचे हा एकमेव अजेंडाच काँग्रेसचा अाहे. हे सरकार सीबीअाय, ईडीमार्फत दमदाटी करून विराेधी पक्षांना अाघाडीत न जाण्यासाठी धमकावत अाहेत. सर्वच पातळीवर अपयश येत नसल्याने व अाश्वासने फाेल ठरल्याने भाजपकडून भीमा-काेरेगावसारखी दंगल घडवत जातीय तेढ निर्माण करून सत्तेत येण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे चव्हाण यांनी सांगितले. याप्रसंगी अामदार डाॅ. सुधीर तांबे, डाॅ. शाेभा बच्छाव, शरद अाहेर, ज्ञानेश्वर गायकवाड, भरत टाकेकर, डाॅ. तुषार शेवाळे, संपत सकाळे, रमेश कहांडाेळे उपस्थित हाेते. 


अारक्षणाच्या मुद्यावर दुटप्पी भूमिका 
मराठा अारक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचा अाराेप चव्हाण यांनी केला. अाघाडी सरकारने १६ टक्के मराठा व ५ टक्के मुस्लिमांना अारक्षण देऊन अंमलबजावणीही सुरू केली हाेती. मात्र, भाजप सरकारने न्यायालयात अध्यादेश चुकीचा ठरविला. प्रतिज्ञापत्रासाठी दीड वर्षाचा कालावधी घालून टाळाटाळ केली. छत्रपतींच्या स्मारकाचीही उंची कमी करण्याचा घाटही घातला हाेता. 


मुख्यमंत्र्यांना बाहेर न पडता येणे शाेकांतिका 
फडणवीस मंत्रिमंडळातील गृहनिर्माणमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करत काेट्यवधींची जमीन कवडीमाेल भावात विक्रीचा पर्दाफाश केला. बिल्डर, प्रशासनातील अधिकाऱ्यांची साेनेरी टाेळी कार्यरत असून त्याची पाळेमुळे खाेदण्यासाठी न्यायिक अायाेग नेमण्याची मागणी मंजूर करावी लागली. पंढरपूरची महापूजा असाे की मनपा प्रचारासाठी बाहेर न पडता येणे, ही मुख्यमंत्र्यांसाठी माेठी शाेकांतिका असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. 

बातम्या आणखी आहेत...