आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या डाेळ्यासमोरच मुलाचा मगरीने घेतला जीव; मिरज तालुक्यातील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे कृष्णा नदीत पोहण्यास गेलेल्या आकाश मारुती जाधव (वय १२) या शाळकरी मुलावर मगरीने हल्ला करून त्याला नदीपात्रात ओढून नेले. नदीकाठावर कपडे धुणाऱ्या त्याच्या आई- बहिणीसमोर गुरुवारी दुपारी ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी या मुलाचा मृतदेह आढळून आला.


चार दिवसांपूर्वी सुटीसाठी आकाश मौजे डिग्रज येथे आई-वडिलांकडे आला होता. गुरुवारी आकाशची आई सुमन जाधव, बहिणी काजल व पूजा नदीकाठावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. आकाशही त्याच्यासोबत गेला होता. पाण्यात पाेहणाऱ्या आकाशवर मगरीने हल्ला केला. जबड्यात पाय ओढून त्याला ओढून नेले. शुक्रवारी त्याचा मृतदेह आढळला. 

बातम्या आणखी आहेत...