आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मासे पकडत होता हा माणूस, मित्र गाइड करत बनवत होता व्हिडीओ, तेवढ्यात तलावात दिसली काहीतरी विचित्र हालचाल, पळा पळा म्हणत धावला माणूस 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैनबरा : ऑस्ट्रेलियामधील एका व्यक्तीचा मासे पकडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो माणूस मासे पकडत आहे तर त्याचा मित्र त्याला ट्रेनिंग देत देत व्हिडीओ बनवत होता. याचदरम्यान त्यांना तलावात काहीतरी हालचाल झाल्यासारखी दिसली आणि थोड्याच वेळात आतून एक मगर बाहेर आली. मगरीला पाहून ते दोघे ओरडत ओरडत उलट्या दिशेने धावत सुटले. ही संपूर्ण घटना त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

माश्याची शिकार करायला आली होती मगर... 
- व्हिडिओमध्ये मासे पकडताना दिसणाऱ्या माणसाचे नाव डॅनिअल आहे. त्याच्या जाळ्यामध्ये एक मोठा मासा फसतो. ज्याला बाहेर काढण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागते. 

- दुसरीकडे डॅनिअलचा मित्र त्याला मासा पकडून ठेवण्याचा सल्ला देतो. तेवढ्यात त्यांना तलावातून एक मोठा प्राणी बाहेर येताना दिसतो. 

- डेनियलच्या मित्रलामित्राला समोरून येणाऱ्या संकटाची चाहूल लागते आणि तो मित्राला जोरजोरात ओरडून पाळायला सांगतो. याचदरम्यान पाण्यातून एक मगर बाहेर येते आणि दोघांच्या मागे लागते. 

- त्यानंतर ती मगर डॅनिअलच्या जाळ्यात अडकलेला माश्याला आपली शिकार बनवते आणि त्याच ठिकाणी थांबते. मग डॅनिअल आणि त्याचा मित्र दूर उभे राहून त्या मगरीच्या व्हिडीओ बनवतात. 
 
- डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियामध्ये मगरींचे असे हल्ले खूप कमी पाहायला मिळतात. वर्षात 1 व्यक्ति अशा हल्ल्यात आपला जीव गमावतो. 

बातम्या आणखी आहेत...