आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Aus Flood: ऑस्ट्रेलियात शतकातील सर्वात मोठा महापूर; रस्त्यावर फिरत आहेत मगरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ऑस्ट्रेलियात पुराच्या थैमानात हजारो लोकांना आपली घरे सोडून पळ काढावा लागला आहे. या पुरात 20 हजार घरे अजुनही धोक्याच्या निशाणावर आहेत. येथील रॉस रिव्हर डॅममधून प्रति सेकंद 1900 क्यूबिक मीटर पाण्याचा विसर्ग होत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी वाइट होणार आहे. पुराचे पाणी रस्त्यांवर आणि घरात घुसत आहे. अशात तलाव आणि नद्यांमध्ये असलेल्या मगरी सुद्धा चक्क रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे, प्रशासनाला सुद्धा हायअलर्ट जारी करावा लागला आहे.


एक अख्खे शहर पाण्यात बुडाले
क्वीन्सलंड प्रांतातील टाउंसविले शहरात अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. तसेच वाहतुकीचा देखील खोळंबा झाला आहे. अनेक लोक छतांवर राहून जगत आहेत. क्वीन्सलंडच्या हवामान विभागाने ही परिस्थिती आणखी वाइट होणार असा इशारा दिला. या शहराचा संपर्क इतर शहरांशी तुटला आहे. क्वीन्सलंडच्या प्रीमियर अॅनास्तासिया पालास्झुक यांनी सांगितल्याप्रमाणे, "हा पूर 10-20 वर्षांतील नव्हे, तर 100 वर्षांतील सर्वात भयंकर पूर आहे. असे नैसर्गिक संकट शतकातून एकदाच येते. त्यातच येत्या काही दिवसांत आणखी पाऊस पडणार असल्याने नागरिकांनी आपल्या घरातच राहावे." स्थानिक माध्यमांनी सुद्धा लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला. हजारोंना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. तसेच मदत आणि बचावकार्यासाठी पोलिस आणि लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...