Home | Business | Gadget | cromebook-will-give-fight-to-microsoft

क्रोमबूकची टक्कर मायक्रोसॉफ्टशी

दिव्य मराठी टीम | Update - May 19, 2011, 05:26 PM IST

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टला टक्कर देण्यासाठी गूगलने आणखी एक प्रयत्न केला आहे.

  • cromebook-will-give-fight-to-microsoft

    माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टला टक्कर देण्यासाठी गूगलने आणखी एक प्रयत्न केला आहे. गूगलने आपला क्रोम लॅपटॉप ज्यालाच क्रोमबूक असेही नाव देण्यात आलंय येत्या जूनमध्ये बाजारात आणणार असल्याचे जाहीर केले. क्रोमबूकमध्ये प्रत्येक फाईल ऑनलाईन साठविण्याची क्षमता आहे. यामुळे सॉफ्टवेअर अपडेट आणि ड्राईव्ह बॅकअपची गरज संपुष्टात येईल, असे गूगलने म्हटले आहे.

    देशातील बहुतांश भागात जिथे आता कॉम्प्युटरवर मायक्रोसॉफ्टचे विंडोज सॉफ्टवेअर आहे, त्याची जागा पुढील काळात क्रोमबूक घेऊ शकेल, असे कंपनीला वाटते. याबाबत गूगलचे सह-संस्थापक सेरगेई ब्रेन म्हणाले, मायक्रोसॉफ्ट असू दे किंवा अन्य कोणतीही कंपनी. कॉम्प्युटरवरील डेटा आणि अन्य कार्यक्रम सांभाळणे ग्राहकांसाठी अवघड बनले आहे.

    क्रोमबूकमध्ये कॉम्प्युटरवरील कार्यक्रम सांभाळण्याचा बोजा ग्राहकांवर पडणार नाही. तरीही मायक्रोसॉफ्टच्या साम्राज्याला आव्हान देणे वाटते तितके सोपे नाही. सर्वसाधारणपणे प्रत्येक ऑफिसमध्ये मायक्रोसॉफ्टचीच ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मोबाईलच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये गूगलने मायक्रोसॉफ्टला मोठी टक्कर दिली असली, तरी कॉम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये आजही मायक्रोसॉफ्ट हिच दादा कंपनी आहे.

    गूगल क्रोम स्वयंचलित पद्धतीने ऑपरेटिंग सिस्टिमला इंटरनेटवर अपडेट करेल. सर्व डेटा ऑनलाईन साठविण्यात येत असल्यामुळे त्याला कोणत्याही बॅकअपची गरज पडणार नाही. ही अत्यंत आधुनिक पद्धती असल्याचे ब्रेन यांनी म्हटले आहे. काही वर्षांपूर्वी कोणीही याचा विचारही केला नव्हता.

Trending