आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Crop Insurance Is The Biggest Scam In The Country; Farmer Fraud; Aditya Thackeray Charged

पीक विमा देशातील सर्वात मोठा घोटाळा; शेतकऱ्यांची फसवणूक; आदित्य ठाकरेंचा आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज करून पैसे भरले, मात्र खासगी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा अाराेप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. गुरुवारी (२९ ऑगस्ट) जनआशीर्वाद यात्रेदरम्यान ते अकोल्यात बाेलत होते. वाडेगाव (ता. बाळापूर) येथील विजय संकल्प मेळाव्यातही त्यांनी पीक विम्याच्या मुद्द्याला हात घालत कंपन्यांची फसवणूक उघड केली. खासगी विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या घरोघरी गेल्या. विम्याचे पैसे घेतले. नुकसानग्रस्त शेतकरी हक्काचे पैसे मागायला गेले तेव्हा तुमच्या गावाचे नुकसान झाले नाही, केवळ तुमच्या शेताचे झाले, अशी उत्तरे कंपन्यांनी दिली. या प्रश्नावर शिवसेनेने मुंबईत मोर्चा काढल्यानंतर विमा कंपन्या ठिकाणावर आल्या अाणि १५ दिवसांत १० लाख शेतकऱ्यांना ९०७ कोटी रुपये मिळाल्याचे आदित्य यांनी वडगाव येथील सभेत सांगितले. राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांची विमा कंपन्यांकडून फसवणूक झाली. विदर्भातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला नाही. त्यामुळे तुम्ही नशीबवान आहात, असेही ठाकरे या वेळी म्हणाले.
 
 

विद्यार्थ्यांशी संवाद 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आदित्य ठाकरे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. वाढते शैक्षणिक शुल्क, बेरोजगारी, महिला सुरक्षा, मजूर-कामगारांच्या अडचणी आदी मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. त्याला उत्तरे देण्याचा प्रयत्न करत आपली शिक्षण पद्धती व अभ्यासक्रम बदलणे अावश्यक असल्याचे आदित्य म्हणाले.
 

सेना शेतकऱ्यांच्या पाठीशी 
वाडेगाव येथील बेसिक मैदानावर दुपारी २.२० ला आदित्य ठाकरे यांची विजय संकल्प मेळाव्याची सभा झाली. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे कायम उभी राहील. सरसकट कर्जमुक्तीशिवाय आम्ही थांबणार नाही, असा शब्द देत त्यांनी लोकांना जनआशीर्वाद मागितला. खासदार भावना गवळी, राज्यमंत्री संजय राठोड, पक्षाचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख आदींची या वेळी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...