आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायाला आढी मारून बसू नये, होऊ शकता आजारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पायांवर आढी मारून बसण्याची सवय बऱ्याच शारीरिक समस्यांना कारणीभूत ठरू शकते. आपल्यालाही अशीच सवय असेल वेळीच ती बंद करा, नाहीतर आजारी होण्याची शक्यता असते.

ब्लड सर्कुलेशन प्रभावित
क्रॉस पाय करून बसल्याने रक्त परिसंचरण चांगले होत नाही, कारण आपण जेव्हा एका पायावर दुसरा पाय ठेवता तेव्हा दोन्ही पायांमध्ये रक्त परिसंचरण एकसारखे होत नाही. यामुळे पाय सुन्न होतात किंवा पायाला मुंग्या येतात.

संधिवात होऊ शकतो 
कार्यालयीन खुर्चीवर दररोज ८ ते ९ तास क्रॉस बसण्यामुळे सांध्यामध्ये वेदना होऊ शकतात. हे टाळण्यासाठी थोडा वेळ आपल्या बसण्याची स्थिती बदलत राहावी, असे केल्याने शरीरात हालचालही राहते आणि थकवादेखील जाणवत नाही. त्यामुळे ऑफिस असो की घर असे बसणे टाळावे.

बीपीचा त्रास होऊ शकतो
बऱ्याच आरोग्य अभ्यासामध्ये आढळले की, एका पायावर आढी मारून बसल्यामुळे नसांवर दबाव पडतो. त्यामुळे रक्तदाब वाढतो. म्हणून, बीपी असलेल्या रुग्णांनी असे बसणे टाळले पाहिजे. त्यांनी आसनाची काळजी घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...