आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापरिनिर्वाण दिन : राष्ट्रपती, पंतप्रधानांचे दिल्लीत तर मुख्यमंत्र्यांचे मुंबईत बाबासाहेबांना अभिवादन, चैत्यभूमीवर भीमसागर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 62 वा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्ताने नवी दिल्लीत संसद भवन परिसरात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तर मुंबईत दादर चैत्यभूमी येथे मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. 

 

मुंबईतील दादर चैत्यभूमीवर राज्यभरातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. रात्रीपासूनच याठिकाणी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. दरम्यान राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या मंत्र्यांनीही चैत्यभूमी येथे जाऊन बाबासाहेबांना मानवंदना दिली आहे. 


मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न 
चैत्यभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्याबरोबर राज्यपाल सीविद्यासागर राव आणि विनोद तावडे हेही उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बाबासाहेबांच्या विचारावर चालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. डॉ. आंबेडकरांनी पाहिलेले समतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत राहील अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. 


दादर टर्मिनसचे नाव बदलण्याची मागणी
दरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी भीम आर्मीच्या वतीने दादर स्टेशनचे नाव बदलण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या स्टेशनला डॉ.बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे नाव देण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी सकाळी दादर स्टेशनवर भीम आर्मीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नावाचे स्टीकर्स चिटकवले आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...