आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: परपुरुषासोबत बेडरूममध्ये होती पत्नी, अचानक घरी पोहोचला CRPF जवान, मग घडले असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहतक - हरियाणाच्या रोहतक पोलिसांनी 30 सप्टेंबर रोजी पानिपतच्या जिंद रोडवर आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले आहे. मृताचे नाव पानीपतच्या भल्लौरचा रहिवासी दीपक (25) असे असून, तो एका शॉपिंग मॉलमध्ये सुपरवायजर म्हणून काम करायचा. अवैध संबंधांमुळे त्याची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

असे आहे प्रकरण...
पोलिसांनी दीपकच्या हत्येप्रकरणी सीआरपीएफचा एका डेप्युटी कमांडंट सुरेश कुमारची पत्नी यमुनाला अटक केली आहे.

 

पोलिसांच्या मते, आरोपी विवाहिता यमुना आणि मृत दीपक दोघेही फेसबुक फ्रेंड होते. 29 सप्टेंबर रोजी महिलेने दीपकला आपल्या घरी बोलावले होते आणि दोघेही रात्रभर एकत्र राहिले. परंतु 30 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजताच यमुनाचा पती जम्मूहून अचानक घरी आला.

पतीने जेव्हा पत्नीला परपुरुषासोबत पाहिले, तेव्हा त्याचा ताबा सुटला. त्याने आधी तर आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली आणि मग आपला मेहुणा गौरवला बोलावून दीपकला विष खाऊ घालून त्याची हत्या केली.

 

हत्येनंतर मृतदेह जिंदच्या रोहतक हायवेवरील डीपीएस शाळेच्या जवळ रस्त्यावर फेकून दिला. मृत दीपकच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय होता. ते पानिपतच्याच दोन तरुणांवर संशय घेत होते.

 

असा लागला खुनाचा छडा
परंतु पोलिसांनी जेव्हा दीपकच्या मोबाइल फोनची कॉल डिटेल काढली तेव्हा कळले की, तो रोहतकच्या बसंत बिहारमधील रहिवासी सीआरपीएफमध्ये डेप्युटी कमांडंट असलेल्या सुरेश कुमारची पत्नी यमुनाशी अनेक वेळा बोलला होता.

 

पोलिसांना जेव्हा यमुनावर संशय आला तेव्हा तिला रोहतकच्या बस स्टॉपवरून अटक करून तिची चौकशी करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखवताच यमुनाने पोलिसांसमोर पूर्ण घटनेचा खुलासा केला.

 

पोलिसांनी दीपकच्या हत्येच्या आरोपात सीआरपीएफचा डेप्युटी कमांडंट सुरेश कुमार, त्याची पत्नी यमुना आणि मेहुणा गौरवविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिला यमुनाला अटक झालेली आहे. तर तिचा भाऊ आणि पती यांना अद्याप अटक झालेली नाही. 

 

 

बातम्या आणखी आहेत...