आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीनेचे लावून दिले पतीचे प्रेयसीसोबत लग्न, स्वतःही परत घेतले सात फेरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जशपूर(छत्तीसगड)- आपण पाहतो की, पती आणि पत्नींच्या मध्ये कोणी तिसरा आला तर मोठा वाद होतो. पण छत्तीसगडच्या जशपूरमध्ये एका पत्नीने आपल्या पतीचे त्याच्या प्रेयसीसोबत लग्न लाऊ दिले. इतकच काय तर पत्नीने स्वतःही पतीसोबत परत सात फेरे घेतले.

 

बगडोल गावात राहणाऱ्या अनिल पँकरा सीआरपीएफचे जवान आहेत. ते सध्या वाराणसीत पोस्टेड आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांचे लग्न जवळच्या गावत झाले होते. त्यानंतर त्यांचे आंगनवाडीत काम करणाऱ्या महिलेशी प्रेम जुळले. त्यांचा हे प्रेम गावात चर्चेचा विषय बनले.


समाज पंचायतीत झाला निर्णय
जेव्हा कधी अनिक सुट्यात घरी यायचा, तेव्हा तो आपल्या पत्नीसोबत कमी आणि प्रेयसीसोबत जास्त वेळ घालवायचा. ते पाहून अनिलची पत्नी म्हणाली की, असे नाते ठीक नाहीयेत. यानंत पत्नीच्या सम्मतीने समाज पंचायत बसवण्यात आली. पंचायतीत ठरल्यानंतर परत अनिलचे लग्न करण्यात आले. संपूर्ण गावासमोर अनिलने आपल्या प्रेयसीसोबत लग्न केले. यावेळी अनिलने आपली प्रेयसी आणि आणि पत्नीसोबत लग्न केले. मंडपात एक नवरा आणि दोन वधु पाहायला मिळाल्या. 

 

हिन्दू मॅरिज अॅक्टनुसार लग्न बेकायदा
सरपंच ललित यांनी सांगितले की, पहिल्या पत्नीपासून अनिलला मुल-बाळ होत नव्हते. त्यामुळे त्याने दुसरे लग्न केले आहेत. अधिवक्ता रामप्रकाश पांडेयने सांगितले की- हिंदू मॅरिज अॅक्टनुसार हे लग्न बेकायदेशीर आहे.