आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीआरपीएफच्या जीपला बसची धडक, एक ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर  - लातूर नजीक असलेल्या सीआरपीफ कॅम्पवरून चाकूर येथील बीएसएफच्या कॅम्पकडे जाणाऱ्या जवानांच्या जीपला ट्रॅव्हल्स बसची जोराची धडक बसल्याने एका जवानाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नांदगाव पाटीजवळील घरणी रेल्वेस्थानकाजवळ  झाला.  

 

लातूूूर जवळील सीआरपीएफच्या कॅम्पवरून जितेंद्र चौधरी (२९), गंभीरसिंग आणि एल. देशमुख हे तिघे चाकूरच्या बीएसएफ कॅम्पकडे फायरिंगच्या सरावासाठी निघाले होते.  त्यांची जीप नांदगाव पाटीजवळ आली असता अहमदपूरकडून येणाऱ्या खासगी बसने जवानांच्या जीपला जोराची धडक दिली. यामध्ये जितेंद्र संजय चौधरी (२९ रा. दहिवड ता. चाळीसगाव जि. जळगाव ) या जवानाचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीरसिंग आणि एल. देशमुख हे गंभीर जखमी झाले. पोलिस आणि नागरिकांनी जखमी जवानांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती गंभीर आहे.