आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटोकियो - जपानमध्ये एका 23 वर्षीय व्यक्तीने त्याच्या माजी बॉसच्या विरोधात एक विचित्र केस दाखल केली आहे. त्याची चौकशी केली तेव्हा बॉसच्या लज्जास्पद कृत्याचा खुलासा झाला. या व्यक्तीने सांगितले की, 3 वर्षांपूर्वी बॉसने एका होम पार्टीत त्याचा चेहरा उकळत्या पाण्यात बुडवला होता. हे पाहून क्लाइंट खुश झाले हे समजल्यानंतर बॉसने पुन्हा तेच कृत्य केले. पण गमतीमध्ये या कर्मचाऱ्याचे तोंड चांगलेच भाजले होते.
अनेक महिन्यांनी ठीक झाला चेहरा...
- हे प्रकरण डिसेंबर 2015 मधील आहे. एका जपानी मॅग्झिननुसार हा व्हिडिओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला. त्यामुळे आता हे प्रकरण सोशल मीडियावर आले आहे.
- व्हिडिओत दिसतेय की, काही लोक एका घरात पार्टी करत आहेत. तर सेंटर कुकींग टेबलवर एक व्यक्ती जेवण तयार करण्याच्या तयारीत आहे. त्याचवेळी त्या व्यक्तीचा बॉस त्याचा चेहरा उकळत्या पाण्यात बुडवतो
- व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडित व्यक्तीने एक प्रेस कॉन्फरन्स घेत मीडियाला सांगितले की, त्याने एक्स बॉसविरोधात गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे.
नोकरीच्या भीतीमुळे उशीर
घटनेला तीन वर्षे झाल्यानंतर पीडित व्यक्तीने आरोपीवर केस केली आहे. त्यामुळे त्याने केस करायला एवढा उशीर का लावला अशा प्रश्न निर्माण होत आहे. दुसरीकडे पीडित व्यक्तीच्या जवळच्या काही लोकांचे म्हणणे आहे की, त्याने नोकरीच्या भीतीमुळे एवढे दिवस केस केली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.