आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधांचा बोभाटा नको म्हणून ड्रायव्हरचे करवतीने तुकडे, मध्य प्रदेशात ड्रायव्हरची क्रूर हत्या 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुनील मंत्री  - Divya Marathi
सुनील मंत्री 

होशंगाबाद - अनैतिक संबंधांचा बोभाटा होईल या भीतीने मध्य प्रदेशातील इटारसीच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर सुनील मंत्री (५५) यांनी दोन दिवसांपूर्वीच नोकरीस ठेवलेला चालक वीरेंद्र पचौरी ऊर्फ वीरू (३०) याची त्यांच्या राहत्या घरात हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करून अॅसिडमध्ये विरघळण्यासाठी टाकून दिले. वीरूच्या पत्नीसोबत डॉक्टरचे अनैतिक संबंध होते. तो डाॅक्टरला एक वर्षापासून ब्लॅकमेल करत होता. डॉक्टरला अटक केली आहे. 


एसपी अरविंद सक्सेना यांनी सांगितले, दोन दिवसांपूर्वीच त्याला १६ हजार रुपये दरमहा पगारावर नोकरीस ठेवले. ४ फेेब्रुवारी रोजी वीरूचा दात दुखत होता. डॉक्टरने त्याला भुलीचे इंजेक्शन दिले. तो बेशुद्ध झाल्यानंतर करवतीने त्याची मान चिरली. धड बाथरूममध्ये नेऊन त्याचे तुकडे केले आणि अॅसिडने भरलेल्या ड्रममध्ये टाकले. 

बातम्या आणखी आहेत...