आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२४२० प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी चलनात प्रचलित, सध्या सर्व प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीचे बाजार भांडवल २५१९४.३० कोटी डॉलर

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • डिजिटल चलनाचे रूप आहे क्रिप्टोकरन्सी

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रिझर्व्ह बँकेचे परिपत्रक रद्द करत क्रिप्टोकरन्सी(अाभासी चलन)मध्ये ट्रेंडिंगला परवानगी दिली.इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या काळात काही वर्षांत क्रिप्टोकरन्सीचा वापर वाढला. अखेर क्रिप्टोकरन्सी काय असते, ते कसे काम करते हे समजून घेऊया. 

डिजिटल चलनाचे रूप आहे क्रिप्टोकरन्सी

क्रिप्टोकरन्सी डिजिटल चलन असते. हे कोणतेही सरकार किंवा बँकेशी संबंधित नसते. एक युजर दुसऱ्यास क्रिप्टोकरन्सी पाठवतो तेव्हा त्याचे रेकॉर्ड इनक्रिप्शनद्वारे म्हणजे सांकेतिक भाषेत होते. हे डिकोड करू शकत नाही. त्यामुळे त्यास क्रिप्टोकरन्सी म्हटले जाते. 

सद्य:स्थितीत बिटकॉइन सर्वात पुढे

बिटकॉइन सध्या सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे बिटकॉइनचे रेकॉर्ड पब्लिक लेजरमध्ये ठेवले जाते. २००९ मध्ये बिटकॉइनच्या निर्मितीपासून आतापर्यंत सर्व ट्रान्झॅक्शन पब्लिक लेजरमध्ये सेव्ह होत राहिले. त्यामुळे त्यास ब्लॉकचेन म्हटले जाते.

जगातील चलनात टॉप क्रिप्टोकरन्सी

क्रिप्टोकरन्सी    मार्केट व्हॅल्यू    किंमत


बिटकॉइन     16059    8,771.29, 
इथेरियम     2475     224.64,
रिप्पल     1030     0.234959,
बिटकॉइन कॅश    597     324.50,
टीथर     439     1.00,
बिटकॉइन एसव्ही    466     239.12,
लाइटक्वाइन     389     60.49,
ईओएस     334     3.63,
बायनेन्स क्वाइन     309     19.93,
तेजोस     198     2.83

कॉम्प्युटर सीपीयूद्वारे बिटकॉइन मायनिंग

बिटकॉइन ट्रान्झॅक्शनचा डेटा पब्लिक लेजरमध्ये सांभाळला जातो. हे मेन्टेन करण्यासाठी संगणकाच्या सीपीयूच्या पॉवरचा वापर होतो. सीपीयूमध्ये बिटकॉइनशी संबंधित सॉफ्टवेअर इन्स्टॉल केला जातो. हे सॉफ्टवेअर गुंतागुंतीची गणितीय गणना करून बिटकॉइनसाठी इनक्रिप्शन तयार करते. 

बिटकॉइनचे महत्त्व एवढे का वाढले
- जपानने बिटकॉइनला कायदेशीर रूप दिले आहे. यानंतर त्याचे मूल्य ६०% पेक्षा जास्त वाढले. जसजसा जास्त लोकांकडून स्वीकार होऊ लागला तसे मूल्यही वाढते. 


- व्यवहारासाठी हे खूप सुरक्षित मानले जाते. यासोबत यावर कुण्या प्राधिकरणाचे नियंत्रण नसल्याने यात हायपर इन्फ्लेशनचा धोका नसतो. 


-नियामक नसल्याने व्यवहाराचा खर्च कमी होतो.

बिटकॉइनमध्ये या वर्षी ५०% तेजी

जगात बिटकॉइन सर्वात जास्त चालणारे व मूल्याची क्रिप्टोकरन्सी आहे. या वर्षी यामध्ये ५०% तेजी आली . ऑक्टोबर २०१९ नंतर प्रथमच बिटकॉइन काही दिवसांत १०,००० डॉलर(७.३० लाख रु.)वर पोहोचला . सध्याचे मूल्य ८,७७१ डॉलर(६.४० लाख रु.) आहे. दुसऱ्या क्रिप्टोकरन्सीतही तेजी राहिली. इथेरियमचे मूल्य दुप्पट झाले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...