आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2019 : चेन्नईला स्पर्धेआधीच मोठा धक्का, हा खेळाडू जाणार स्पर्धेबाहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - आयपीएलचा गतचॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जला स्पर्धेआधीच मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी स्नायू दुखावल्यामुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही. श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेदरम्यान त्याच्या पायाचे स्नायू दुखावले. धोनीला हा मोठा धक्का आहे. कारण त्याने गतहंगामात शानदार गोलंदाजी केली होती. 

 

दक्षिण आफ्रिका संघाचे व्यवस्थापक मोहम्मद मुसाजी यांनी सांगितले, एन्गिडीला श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात गोलंदाजी करताना समस्या जाणवत होती. त्याने लगेच गोलंदाजी थांबवली. तपासणीत त्याचे स्नायू दुखावल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला चार आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यानंतर विश्वचषकापर्यंत पुनरागमनाची प्रक्रिया पार पडेल. तो आमच्या संघाचा महत्त्वाचा भाग आहे. विश्वचषकाआधी तो तंदुरुस्त व्हावा, यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत. 

 

कर्णधार धोनीला पहिल्या घासालच खडा 
दरम्यान चेन्नईने एन्गिडीच्या जागी नव्या खेळाडूची घोषणा अजून केली नाही. त्याने गतहंगामातच आयपीएलमध्ये डेब्यू केला होता. चेन्नईने त्याला ५० लाख रुपयांत खरेदी केले होते. गतवर्षी आयपीएलचे ७ सामने एन्गिडीने खेळले. त्यात १५६ धावा देऊन ११ बळी घेतले. १० धावांत ४ बळी ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी. त्याला स्पर्धेआधीच दुखापत हा कर्णधार धोनीसाठी जणू पहिल्या घासालाच खडा ठरला आहे.