आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गतचॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जचा विजय; बंगळुरूवर सलग सातव्यांदा केली मात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - गतचॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज  संघाने शनिवारी यंदाच्या १२ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. यजमान चेन्नई संघाने अापल्या घरच्या मैदानावर विराट काेहलीच्या राॅयल चॅलेजर्स बंगळुरूचा पराभव केला. चेन्नई संघाने १७.४ षटकांत ७ गड्यांनी सामना जिंकला. यासह महेंद्रसिंग धाेनीच्या चेन्नई संघाने २ गुणांची कमाई करून गुणतालिकेत अव्वल स्थानावर धडक मारली. चेन्नईचा हा बंगळुरू संघावरचा सलग सातवा विजय ठरला. 

 

 हरभजनसिंग (३/२०) आणि इम्रान ताहिरच्या (३/९) धारदार गाेलंदाजीमुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरू संघाचा १७.१ षटकांत अवघ्या ७० धावांवर खुर्दा उडाला. प्रत्युत्तरात चेन्नईने ३ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य  गाठले.  विजयात अंबाती रायडू, रैनाने माेलाचे याेगदान दिले. 

 

हरभजन, ताहिरची धारदार गाेलंदाजी

चेन्नईच्या सुपर विजयासाठी हरभजनसिंग अाणि इम्रान ताहिरने धारदार गाेलंदाजी केली. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या राॅयल चॅलेंजर्स संघाचा धुव्वा उडाला. या दाेघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. हरभजनसिंगने चार षटकांत २० धावा देताना तीन बळी घेतले. त्याने सलामीवीर अाणि कर्णधार विराट काेहली (६), डिव्हिलियर्स (९) अाणि माेईन अलीला (९) बाद केले. तसेच ताहिरने चार षटकांत ९ धावा देताना ३ गडी बाद केले. त्याने शिवम दुबे (२), यजुवेंद्र चहल (४) अाणि नवदीपला (२) बाद बाद केले. 

 

 

उद्घाटन साेहळा रद्द; रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबीयांना

यंदा १२ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगचा रंगारंग हाेणारा उद्घाटन साेहळा रद्द करण्यात अाला.यासाठी लागणारी सर्व रक्कम ही पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटंुबीयांना देण्यात अाली. या रकमेचा धनादेश चेन्नईचा कर्णधार धाेनीचा हस्ते पाेलिस अधिकाऱ्यांकडे देण्यात अाला.

बातम्या आणखी आहेत...