आयपीएल-१२ : चेन्नई सुपरकिंग्ज संघाची चाैथ्या विजयासह अव्वलस्थानी धडक

वृत्तसंस्था

Apr 07,2019 09:42:00 AM IST

चेन्नई - गत चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघाने शनिवारी १२ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आपल्या पाचव्या सामन्यात शानदार विजयाची नाेंद केली. चेन्नईने आपल्या घरच्या मैदानावर पाहुण्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला. धाेनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने २२ धावांनी सामना जिंकला. या चाैथ्या विजयाच्या बळावर चेन्नई संघाने गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर धडक मारली. चेन्नईचे गुणतालिकेमध्ये ८ गुण झाले आहेत. तसेच पंजाबच्या संघाला दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.
चेन्नई संघाने प्रथम फलंदाजी करताना तीन बाद १६० धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात किंग्ज इलेव्हन पंजाबला ५ गड्यांच्या माेबदल्यात १३८ धावांपर्यंत मजल मारता आली. धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाब संघाकडून ख्रिस गेल (५) आणि मयंक अग्रवाल (०) हे दाेन्ही स्फाेटक फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यांचा माेठ्या खेळीचा प्रयत्न अपुरा ठरला. या दाेघांनाही चेन्नईच्या स्पिनर हरभजन सिंगने दुसऱ्याच षटकात बाद केले. त्यामुळे पंजाबला ७ धावांसाठी दाेन विकेट गमवाव्या लागल्या. चेन्नईकडून हरभजन सिंग अाणि वेगवान गाेलंदाज कुग्गेलेजीन यांनी शानदार खेळी केली. त्यामुळे पंजाबचा विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला.

X
COMMENT