Home | Sports | From The Field | CSK Qualify for Play off for IPL 2019

चेन्नई सुपरकिंग्ज यंदा प्ले ऑफमध्ये दाखल झालेला ठरला पहिला संघ; हैदराबाद संघावर ६ गड्यांनी मात

वृत्तसंस्था | Update - Apr 24, 2019, 09:12 AM IST

चेन्नई सुपरकिंग्जची आठव्या विजयासह अव्वल स्थानावर धडक

  • CSK Qualify for Play off for IPL 2019

    चेन्नई - गत चॅम्पियन यजमान चेन्नईचे सुपरकिंग्ज यंदाच्या १२ व्या सत्रातील आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये दिमाखदारपणे दाखल झाले आहे. अशा प्रकारे प्ले ऑफमधील प्रवेश करणारा चेन्नई सुपरकिंग्ज हा यंदा पहिला संघ ठरला आहे. शेन वाॅटसन (९६) अाणि केदार जाधवच्या (नाबाद ११) झंझावाती खेळीच्या बळावर चेन्नई संघाने आपल्या घरच्या मैदानावर मंगळवारी सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. चेन्नई संघाने ६ गड्यांनी सामना जिंकला. यासह चेन्नईने आठव्या विजयाची नाेंद केली.


    हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद १७५ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात चेन्नईला विजयासाठी शेवटच्या चेंडूवरपर्यंत शर्थीची झुंज द्यावी लागली. मात्र, तरीही केदार जाधवने एकाकी झुंज देऊन विजयश्री खेचून आणली. चेन्नईने चार गड्यांच्या माेबदल्यात हा सामना जिंकला. संघाच्या विजयात शेन वाॅटसनने माेलाचे याेगदान दिले. त्याने अर्धशतक साजरे केले. याशिवाय सुरेश रैनासाेबत त्याने अर्धशतकी भागीदारी रचली. या दाेघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यामुळे टीमच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. यादरम्यान वाॅटसनने आपल्या टी-२० करिअरमध्ये ८ हजार धावा पूर्ण केल्या. असा पल्ला गाठणारा ताे नववा फलंदाज ठरला.

    या विजयाच्या बळावर चेन्नईने पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थानावर धडक मारली. त्यामुळे आता चेन्नईचे सर्वाधिक १६ गुण झाले अाहेत. भुवनेश्वरच्या हैदराबाद संघाला पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, तरीही हैदराबादचा संघ गुणतालिकेत चाैथ्या स्थानावर कायम आहे.

Trending